कुस्तीपटू विनेश फोगटनं राजकारणात एंट्री केली आहे. तिनं 6 सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आता काँग्रेसनं हरियाणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली. हरियाणामध्ये एकूण 90 विधानसभा मतदारसंघ आहेत,. त्यापैकी काँग्रेसनं नुकतीच 31 उमेदवारांची यादी जाहीर केली. पहिल्या यादीमध्ये विनेश फोगटचं देखील नाव आहे.
विनेश फोगट हिला जुलाना सीटवरून काँग्रेसचं तिकीट मिळालं आहे. यादी जाहीर होण्यापूर्वी विनेशला तिचं निवासस्थान असलेल्या चरखी दादरी सीटवरून उमेदवारी मिळेल, असं बोललं जात होतं. मात्र आता ती तिच्या सासरच्या जुलाना मतदारसंघातून राजकीय आखाड्यात उतरणार असल्याचं निश्चित झालं आहे. कुस्तीच्या मैदानात अमाप यश मिळवलेली विनेश आता राजकीय मैदानात किती यशस्वी ठरते, हे येणारा काळच सांगेल. हरियाणा विधानसभेसाठी 5 ऑक्टोबरला मतदान होणार असून निकाल 8 ऑक्टोबरला लागेल.
विनेशसोबत ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया यानं देखील काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याची अखिल भारतीय काँग्रेस किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विनेश विरुद्ध कोण निवडणूक लढेल, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीनं अद्याप या सीटवर आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही.
यंदाच्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत अनेक खेळाडू आपला जोर आजमावताना दिसतील. यावेळी भारताचा स्टार कबड्डी खेळाडू दीपक निवास हुडा निवडणूक लढवणार आहे. दीपक हुडा याला मेहम विधानसभा मतदारसंघातून भाजपाचं तिकीट मिळालंय. हरियाणामध्ये 90 विधानसभा मतदारसंघ आहेत. बहुमतासह सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 46 जागा जिंकणं आवश्यक आहे. विनेश ज्या जागेवरून निवडणूक लढवत आहे, त्या जागेवरून गेल्या वेळी जेजेपी जिंकली होती. तर भाजपाला दुसरं स्थान मिळालं होतं.
हेही वाचा –
भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी पंत सज्ज, दुलीप ट्रॉफीत यष्टीमागे दाखवली चपळता
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटसोबत कट झाला होता? राजकारणात प्रवेश केल्यानंतर दिलं सूचक उत्तर
“भारतीय संघात सध्या दर्जेदार फिरकीपटू नाहीत”, वीरेंद्र सेहवागचे वादग्रस्त विधान!