---Advertisement---

CWG BREAKING: भारताची वाघीण दहाडली! विनेशने कायम राखली फोगट घराण्याची सुवर्ण परंपरा

On: शनिवार, ऑगस्ट 6, 2022 10:41 PM
---Advertisement---

भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी (६ ऑगस्ट) भारताला कुस्तीतील पाचवे सुवर्णपदक मिळवून दिले. तिने ५३ किलोग्राम फ्रीस्टाइल वजनी गटात ही कामगिरी केली. विशेष म्हणजे मागील तीनही राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार म्हणून विनेश सहभागी झाली होती. आपल्याकडून असलेल्या या अपेक्षा पूर्ण केल्या. विनेशने ‘नॉर्डिक फॉरमॅट’ मधील सामन्यांच्या या प्रकारात आपले तीनही सामने जिंकले आणि सर्वाधिक गुण मिळवून सुवर्ण जिंकले. अशाप्रकारे विनेशने राष्ट्रकुल स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकून शानदार हॅट्ट्रिक पूर्ण केली.

विनेशने याआधी २०१४ ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये ४८ किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तर २०१८ गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये ५० किलो गटामध्ये सुवर्णपदक जिंकलेले. यानंतर आता बर्मिंघममध्ये ५३ किलो वजनी गटामध्ये तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले. या पदकामुळे विनेशची गेल्या वर्षीच्या टोकियो ऑलिम्पिकमधील निराशा काही प्रमाणात कमी झाली असेल. टोकियोमध्ये ती पदकाची दावेदार होती. मात्र, तिथे तिला अपयश आले होते. आता वर्षभरानंतर तिने महत्त्वाचे पदक जिंकले आहे.

भारतीय पथकासाठी कुस्तीचे दोन्ही दिवस शानदार ठरले. ५ ऑगस्ट रोजी तीन सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य अशी सहा पदके भारताने पटकावले होती‌. ऑलम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया व साक्षी मलिक सह दीपक पुनिया याने सुवर्णपदकावर आपला हक्क सांगितला होता. त्या व्यतिरिक्त अंशू मलिकने रौप्य तसेच दिव्या कांकरान आणि मोहित ग्रेवालने कांस्य पदक आपल्या नावे केलेले. तर दुसऱ्या दिवशी विनेशसह कुमारनेही सुवर्णपदक जिंकले. युवा कुस्तीपटू पूजा गहलोतला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० विश्वचषकाच्या तयारीवरून दिनेश कार्तिकचे बडे बोल! म्हणाला, ‘भारताला…’

इंग्लंडला बगल देत टीम इंडियाने गाठली फायनल! स्म्रीतीचे अर्धशतक तर गोलंदाजीत ‘या’ खेळाडूने दाखवले कसब

CWG BREAKING: महाराष्ट्र सुपुत्र अविनाश साबळेने रचला ‘रूपेरी’ इतिहास; मोडले केनियाचे २४ वर्षांचे वर्चस्व

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---