पॅरिस ऑलिम्पिक नुकतेच संपले. तत्पूर्वी विनेश फोगटला (Vinesh Phogat) अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरवलेल्या प्रकरणात संपूर्ण देश क्रीडा लवादाच्या न्यायालयाकडून (CAS) न्यायाची अपेक्षा करत आहे. आज (13 ऑगस्ट) रोजी सीएएस (CAS) विनेशच्या केसवर निर्णय देणार आहे. हा निर्णय भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता येईल असे सांगण्यात आलं आहे.
(9 ऑगस्ट) रोजी सीएएसमध्ये (CAS) विनेश फोगटच्या (Vinesh Phogat) प्रकरणावर सुमारे 3 तास चर्चा झाली. विनेशची केस देशातील प्रसिद्ध वकील हरीश साळवे (Harish Salve) हाताळत होते. मात्र, या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सीएएसनं विनेशकडून 3 प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनेशच्या उत्तराच्या आधारेच सीएएस (CAS) आपला निर्णय देण्याची शक्यता आहे.
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटनं (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी कुस्तीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती विनेशनं प्रथम 4 वेळा विश्वविजेत्या आणि गेल्या ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या प्रतिस्पर्धीचा पराभव केला आणि नंतर उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत धमाकेदार विजय मिळवला. त्यामुळे विनेशनं अंतिम फेरी गाठली होती. सर्वांना विनेशकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही.
अंतिम फेरीच्या दिवशी विनेश फोगटला 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे अपात्र घोषित करण्यात आले. त्यानंतर विनेशनं सीएएसकडे अपील करून रौप्य पदकाची मागणी केली होती. आता सीएएस आज निर्णय देणार आहे. संपूर्ण देशाला सीएएसकडून रौप्य पदकाची अपेक्षा आहे. विनेशला ते मिळाले तर पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचं सातवं पदक असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी ‘या’ दिग्गज खेळाडूला झाली मोठी दुखापत
इशानकडे स्वत:हून चालून आली संधी, संघात पुनरागमन करताच गळ्यात पडली कर्णधारपदाची माळ
पुणे फुटबाॅल: रूपाली एससीचा सहज विजय