---Advertisement---

टी२० विश्वचषकात भारताला सुरुवातीलाच अपयश आल्याने विनोद कांबळीची धोनीच्या मार्गदर्शक पदावर टीका

On: गुरूवार, नोव्हेंबर 4, 2021 12:51 AM
---Advertisement---

संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ साठी भारतीय संघ विजयाच्या दावेदारीसह मैदानात उतरला होता. टी२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची निवड झाल्यापासून भारताला विजेतेपदाच्या मोठ्या आशा होत्या, कारण भारतीय संघात कर्णधार विराट कोहलीसह माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा देखील मार्गदर्शक म्हणून समावेश करण्यात आला होता. पण भारताला स्पर्धेच्या सुरुवातीलाच मोठे अपयश आले. त्यामुळे माजी खेळाडू विनोद कांबळीने धोनीची मार्गदर्शक म्हणून निवड झाल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.

या विश्वचषकात भारतीय संघाच्या सलग दोन पराभवानंतर अनेक आजी-माजी खेळाडू संघावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. दरम्यान, भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने फक्त मार्गदर्शक धोनीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विनोद कांबळीने धोनीला मार्गदर्शक म्हणून पूर्णपणे अपयशी म्हटले आहे.

विनोद कांबळीने सोशल मीडियाच्या माध्यमातून लिहिले की, ‘टी२० विश्वचषकात मोठ्या अपेक्षांसह बीसीसीआयने एमएस धोनीचा भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये समावेश केला. त्याच्या मार्गदर्शनाखाली ज्या प्रकारची कामगिरी अपेक्षित होती, भारतीय संघ त्याच्या उलट खेळ दाखवत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने भलेही एखादी मोठी स्पर्धा जिंकली नसेल, पण साखळी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून ते अंतिम चारमध्ये निश्चित स्थान मिळवत आले आहेत.’

Koo App

T-20 वर्ल्ड कप में बहुत ही उम्मीदों के साथ BCCI ने एमएस धोनी को टीम इंडिया के ड्रेसिंग रूम में शामिल किया था। उनकी मेंटरशिप में जिस तरह के प्रदर्शन की उम्मीद की गई थी, टीम इंडिया उससे उल्टा ही खेल दिखा रही है। विराट कोहली की कप्तानी में भले ही टीम इंडिया ट्रॉफी नहीं जीती, लेकिन लीग मैचों में अच्छे प्रदर्शन के साथ वह अंतिम चार में जगह बनाती रही है, लेकिन इस बार तो धोनी की मेंटरशिप में भारतीय टीम के

Vinod Kambli (@vinodkambli) 2 Nov 2021

भारताच्या सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंग धोनीला टी२० विश्वचषकात खास मार्गदर्शक बनवण्यात आले होते. एमएस धोनीला मार्गदर्शक बनवल्यानंतर मोठ-मोठ्या क्रिकेट पंडितांनी भारत विजेता होईल, असे भाकीत केले होते. महेंद्रसिंग धोनीने जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या योजनांमुळे एक खास ओळख निर्माण केली आहे. कर्णधार म्हणून त्याने स्वतःच्या रणनीतीने भारतासाठी अनेक सामने जिंकले आहेत, त्यामुळे जेव्हा तो मार्गदर्शक बनला, तेव्हा तो भारतीय संघाच्या थिंक टँकचा सर्वात मोठा चेहरा बनला होता.

महेंद्रसिंग धोनीची भारतीय संघात मार्गदर्शक म्हणून भर पडल्याने विराट कोहलीचा त्रास खूपच कमी मानला जात होता, पण स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीच्या पाठिंब्याने भारतीय संघावर कोणतीही जादू दाखवली नाही. केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक क्रिकेटमधील अनेक दिग्गज धोनीचे संघात सामील होणे चांगले लक्षण मानत होते, परंतु हा निर्णय भारतीय संघाच्या अजिबात कामी येऊ शकला नाही.

या विश्वचषकाच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले असून, त्यानंतर उपांत्य फेरीच्या आशाही धोक्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

स्कॉटलंडविरुद्ध न्यूझीलंडचा १६ धावांनी महत्त्वपूर्ण विजय, मार्टिन गप्टिलची तुफानी खेळी

स्कॉटलंडच्या यष्टीरक्षकाची गंमतीदार कोपरखळी; गोलंदाजाला म्हणाला, ‘संपूर्ण भारत तुझ्या पाठीशी’

‘बीसीसीआयने आता मोठ्या खेळाडूंचे भविष्य ठरवण्याची वेळ आली आहे’, कपिल देव भडकले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---