आजकाल असे दिसते की क्रिकेटजगतात फॅब फोर (Fab Four) निवडण्याचा ट्रेंड आहे, प्रत्येकजण आपला फॅब फोर निवडत आहे. फॅब फोरमध्ये विराट कोहलीसोबत स्टीव्ह स्मिथ (Steve Smith), केन विलियम्सन (Kane Williamson), जो रूट (Joe Root) आणि बाबर आझम (Babar Azam) यांची नावे सामायिक आहेत. मात्र, भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) याच्या यादीत असे नाही. कांबळीच्या फॅब फोरच्या यादीत विराट कोहली आहे. मात्र, बाकीची नावे गायब आहेत. आता प्रश्न असा आहे की, कांबळीने आपले फॅब फोर म्हणून आणखी कोणाची निवड केली आहे?
सचिन तेंडुलकरच्या अधिकृत ऍपवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कांबळीने फॅब फोर संदर्भात आपले उत्तर दिले आहे. एका ऍपने ट्विट केले आणि विचारले की, क्रिकेटमधील तुमचे फॅब फोर कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर अनेक क्रिकेट चाहत्यांनी दिले. पण विनोद कांबळीने दिलेले उत्तर वेगळेच आहे.
भारताचा माजी डावखुरा फलंदाज विनोद कांबळी याने विराट कोहलीचा (Virat Kohli) क्रिकेटच्या फॅब फोरमध्ये समावेश केला आहे. मात्र स्मिथ, विलियम्सन, बाबर व रूट या सर्व फलंदाजांना त्याच्यापासून दूर ठेवण्यात आले आहे. विराट व्यतिरिक्त कांबळीने आपल्या फॅब फोरमध्ये सुनील गावसकर (Sunil Gavaskar), विव्ह रिचर्ड्स (Viv Richards) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांना जागा दिली आहे.
कांबळीचा फॅब फोर पाहता, सध्याच्या फलंदाजांमध्ये न राहता त्याने आपले ऑल टाईम फॅब फोर निवडले आहेत, असे दिसते. त्याने आपल्या फॅब फोरमध्ये ७०-८० च्या दशकातील दोन फलंदाजांना ठेवले. ९० च्या दशकातील सचिन तेंडुलकरची निवड केली. तर, सध्याच्या काळातील विराट कोहलीला स्थान देण्यात आले आहे. त्याच्या फॅब फोरमध्ये तीन भारतीय आहेत हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे.
विनोद कांबळीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची जोरदार सुरुवात झाली होती. इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या कारकिर्दीतील तिसऱ्या कसोटीत त्याने द्विशतक झळकावले. यानंतर पुढच्या कसोटीत त्याने झिम्बाब्वेविरुद्ध २२७ धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या पुढील कसोटी मालिकेत त्याने दोन शतके झळकावली. वाढदिवसाच्या दिवशी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना शतक झळकावणारा तो पहिला क्रिकेटर आहे. मात्र, कामगिरीत सातत्य न राखता आल्यामुळे त्याची कारकीर्द लवकर संपुष्टात आली. (ODI Hundred On Birthday)
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडला ऍडलेड कसोटीत भोवल्या ३ मोठ्या चूका, त्यामुळे पत्करावा लागला सलग दुसरा पराभव
यशस्वी भव! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाला मिळाला ‘मास्टर क्लास’