---Advertisement---

‘मी खूप भाग्यवान की, सचिनसारखा मित्र मिळाला’, कांबळीने शेअर केला मैत्रीचे उदाहरण देणारा व्हिडिओ

Sachin-Tendulkar-and-Vinod-Kambli
---Advertisement---

क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज खेळाडूंच्या मैत्री मधील अनेक किस्से आहेत. त्यातील अख्ख्या जगाला माहिती असलेली मैत्री म्हणजे 49 वर्षीय माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि 48 वर्षीय माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची. हे दोन्ही दिग्गज आता अनेकदा वेगवेगळ्या व्यासपीठावर एकत्र दिसतात. याशिवाय दोन्ही दिग्गज नेहमीच एकमेकांच्या मैत्रीबद्दल भरभरून बोलतानाही दिसतात. नुकताचा त्यांच्यातील मैत्री दाखवणारा एक व्हिडिओ विनोद कांबळी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

विनोद कांबळी यांनी कू ऍपवर शेअर केलेला व्हिडिओ सगळीकडे प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या घराच्या भिंतीवर स्वतःच्या आणि सचिनच्या आठवणी दाखवताना दिसत आहे. माजी भारतीय क्रिकेटपटूने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सचिन आणि कांबळी यांच्या काही एकत्र घालवलेल्या अनेक क्षणांचे फोटो भिंतीवर लावलेले दिसत आहेत.

हा व्हिडिओ पोस्ट करताना कांबळी यांनी लिहिले की, ‘सगळ्यांना मैत्रीचा अर्थ कळत नाही, कारण कदाचित प्रत्येकालाच चांगला आणि खरा मित्र मिळत नाही. मी खूप भाग्यवान आहे की मला सचिनसारखा मित्र मिळाला. माझ्या घराच्या या कोपऱ्यात फक्त अशाच सुंदर आठवणी आहेत, ज्या मी आयुष्यभर जपून ठेवीन आणि त्या या फोटोंमधून विणल्या आहेत.’

Koo App

दोस्ती के मायने हर कोई समझ नहीं पाता, क्योंकि शायद हर किसी को एक अच्छा और सच्चा दोस्त नहीं मिलता. मैं बहुत खुशनसीब हूं की सचिन जैसा यार मेरे पास है. मेरे घर के इस कोने में सिर्फ ऐसी खुबसूरत यादें हैं जिन्हें मैं पूरी जिंदगी संभाल कर रखूंगा और ये बुनी हुई हैं इन तस्वीरों से. #koooftheday #sachintendulkar #Dosti #Vinodkamblicorner

Vinod Kambli (@vinodkambli) 30 Dec 2021

कांबळी आणि तेंडुलकर दोघांनाही क्रिकेटचे धडे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून मिळाले. यादरम्यान दोन्ही खेळाडूंची मैत्रीही घट्ट होत गेली. या दोघांनीही भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व केले. मात्र, कांबळी फार काळ त्याची जागा टिकवून ठेवू शकले नाही. सचिनने मात्र, उत्तम खेळ करत २४ वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकिर्द घडवली.

महत्त्वाच्या बातम्या –

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडली २०२१ वर्षातील सर्वोत्तम कसोटी ‘प्लेइंग इलेव्हन’, ‘या’ ४ भारतीयांना दिले स्थान

संघसहकारीच म्हणतोय, ‘तुझी जीभ खूप चालतेय सूर्या’; वाचा सविस्तर

विराट, रोहित नव्हे, तर केवळ ‘या’ दोन भारतीय खेळाडूंना मिळाले आयसीसीच्या पुरस्कारांसाठी नामांकन

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---