---Advertisement---

संघसहकारीच म्हणतोय, ‘तुझी जीभ खूप चालतेय सूर्या’; वाचा सविस्तर

On: शुक्रवार, डिसेंबर 31, 2021 4:49 PM
suryakumar
---Advertisement---

भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (suryakumar yadav) आणि अष्टपैलू अक्षर पटेल (axar patel) सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. भारतीय संघाचा उत्कृष्ट फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (yuzvendra chahal) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून खेळाडूंसोबतचा एक फोटो शेअर केला होता. चहलच्या या इंस्टाग्राम पोस्टवर केलेल्या कमेंट्समुळे सूर्यकुमार आणि अक्षर पटेल चर्चेत आले आहेत.

युजवेंद्र चहलने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याच्यासोबत कुलदीप यादव, अक्षर पटेल, ईशान किशन, भुवनेश्वर कुमारसह इतर खेळाडू दिसत आहेत. चहलने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, सुपर स्क्वॉड १०० इन! या पोस्टवर सूर्यकुमार आणि अक्षरने केलेल्या कमेंट्स तुफान व्हायरल झाल्या आहेत. चाहते चहलच्या पोस्टला देखील खूप पसंती दर्शवत आहेत.

सूर्यकुमारने कमेंटमध्ये लिहिले की, ‘अक्षर पटेल तुझ्या डोक्यावर काहीतरी आहे.’ सूर्यकुमारच्या या कमेंटवर अक्षरने उत्तर देताना लिहिले की, ‘सूर्या तुझी जीभ खूप चालते.’ दरम्यान, अक्षर पटेलने डोक्याच्या वरच्या भागातील केलांना कलर केले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सूर्यकुमारने या पोस्टवर ही कमेंट केली असावी.

अक्षर पटेलने कमेंटला दिलेले प्रत्युत्तर पाहून सूर्यकुमार म्हणाला की, ‘अक्षर हात जास्त चालतात.’ एवढे होऊनही अक्षर पटेल थांबला नाही आणि पुढे लिहिले की, ‘माझी ताकत विसरू नको.’ या दोघांनी कमेंट्समध्ये केलेली चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.

दरम्यान, सूर्यकुमार मागच्या काही दिवसांपूर्वी देखील चर्चेत आला होता. जेव्हा त्याने ७४ व्या पोलीस शील्ड क्रिकेट स्पर्धेत दुहेरी शतक केले होते. त्याने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात १५२ चेंडूत तब्बल २४९ धावा ठोकल्या होत्या. या तुफानी खेळीसाठी त्याला सामनावीर देखील निवडले गेले होते. परंतु, त्याने सामनावीर पुरस्कारासाठी मिळालेली  रक्कम मैदानावरील कर्मचाऱ्यांना बक्षिस दिली. त्याच्या मते मैदानावरील कर्मचाऱ्यांना अपेक्षित सन्मान मिळत नाही आणि खेळाडूंनी त्यांच्या योगदानाची दखल घेतली पाहिजे.

महत्वाच्या बातम्या –

‘या’ कारणामुळे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार पराभूत होऊनही आहे खुश, वाचा काय म्हणाला..

Year Ending 2021 | ‘ही’ आहे कसोटी क्रिकेटमधील २०२१ ची सर्वात फ्लॉप ‘प्लेइंग इलेव्हन’

Memories 2021 | यावर्षीचे क्रीडा क्षेत्रातील ५ खास क्षण, जेव्हा कोट्यवधी भारतीयांची उंचावली मान

व्हिडिओ पाहा –

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---