४९ वर्षीय विनोद कांबळीने कू ॲपवर (Vinod Kambli Koo) त्यांचा जुना फोटो शेअर केला. त्या फोटोमध्ये सचिन तेंडुलकरसोबत अजून २ क्रिकेटर दिसत आहेत. कांबळीने या फोटोला जुनं हिंदी गाण्याचं कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं आहे की, ‘शत्रूंचा जरी काळ आला तरी आपली मैत्री अशीच राहूदे.’
कांबळीने शेअर केलेल्या फोटोमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सोबत २ खेळाडू अजून आहेत. एकाच्या हातात ट्रॉफीसुद्धा आहे. पण कांबळीने त्या दोघांबद्दल काही सांगितलेलं नाही. या फोटोत सचिन आणि कांबळीला आपण सहज ओळखू शकतो. परंतु इतर दोघांची नावे ओळखणे अतिशय कठीण आहे.
विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर हे खूप चांगले मित्र आहेत. दोघं शालेय वयीन क्रिकेटपासून सोबत आहेत. मुंबईसाठी सुद्धा ते एकत्र खेळले. परंतु सचिनएवढा कांबळी पुढे नाही येऊ शकला. कांबळीने भारतासाठी १७ कसोटी सामने खेळून त्यात ४ शतकांसह १०८४ धावा केल्या. यासोबत कसोटीमध्ये द्विशतक सुद्धा साजरं केलं. तसेच १०४ एकदिवसीय सामने खेळून २४७७ धावा केल्या. ज्यात २ शतक आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटवेडा स्मिथ! रात्रीच्या १ वाजता नवीन बॅटने करत होता शॅडो प्रॅक्टिस, पत्नीने व्हिडिओ केला शेअर