सध्या सुरू असलेल्या टोकिओ पॅरालिम्पिकमध्ये रविवारी (२९ ऑगस्ट) भारतीय खेळाडूंनी कमालीची कामगिरी केली. या पॅरालिम्पिकमध्ये भारताने रविवारी ३ पदकं पटकावली. भाविनाबेन पटेल, निषाद कुमार यांच्यानंतर आता थाळीफेकमध्ये भारताच्या विनोद कुमारने कांस्य पदक मिळवले आहे.
कुमारने थाळीफेकच्या अंतिम सामन्यात एफ-५२ इव्हेंटमध्ये १९.९१ मीटरपर्यंत थाळी फेकली. यासह कुमारने कांस्य पदकावर आपले नाव कोरले. तर क्रोएशियाच्या वेलीमीरने १९.९८ मीटरपर्यंत थाळी फेकून रजत पदकावर आपले नाव कोरले. तर पोलंडच्या पिओत्राने २०.०२ मीटरपर्यंत थाळी फेकून सुवर्णपदक पटकावले.
कुमार ३० वर्षांचा असताना या खेळाकडे वळाला होता. वयाच्या ४१ व्या वर्षी कुमारने पॅरालिम्पिकमध्ये पदक पटकवले. याच सोबत त्याने एशियाडचा देखील विक्रम प्रस्थापित केला. कुमारच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले जात आहे.
https://twitter.com/ParalympicIndia/status/1431996058750504962
पंतप्रधान नरेंद्र मोदी, कांग्रेस नेते राहुल गांधी तसेच भारतीय पॅरालिम्पिक समितीची प्रमुख दीपा मलिक यांसह अनेक दिग्गज मंडळींनी कुमारच्या या कामगिरीबद्दल त्याचे कौतुक केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कुमारचे कौतुक करत लिहिले, “संपूर्ण भारत विनोद कुमार यांना त्यांच्या कामगिरीबद्दल आभार व्यक्त करत आहे. कांस्यपदक जिंकण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, त्यांच्या कठोर मेहनत आणि इच्छाशक्तीने त्यांना ही कामगिरी करण्यात मदत केली”
तसेच कुमारला पदक मिळण्याच्या थोडा वेळापूर्वीच उंच उडीमध्ये निषाद कुमारने रजत पदक पटकावले होते. जे टोकियो पॅरालिम्पिकमधील भारताचे दुसरे पदक होते. याआधी टेबल टेनिसपटू भाविना बेन पटेलने देखील रजत पदक पटकावले होते. तिच्या या पदकासह भारताने पॅरालिम्पिकमधील आपले पहिले पदक पटकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
–पॅरालिम्पिकमध्ये भाविनाबेनची ‘रुपेरी’ कामगिरी, ‘या’ लोकांना केले पदक समर्पित
–आनंदाची बातमी! टोकियो पॅरालिंपिकमध्ये भारताच्या भाविना पटेलने जिंकले ‘रौप्य पदक’
–पुजारा, रहाणेनंतर आता रिषभ पंत चाहत्यांच्या रडारवर; ‘या’ खेळाडूला खेळवण्याची होतेय मागणी