क्रिकेट जगतात प्रत्येक फलंदाज हा त्याच्या फलंदाजी क्रमांकानुसार फलंदाजीचा सराव करत असतो. जेणेकरुन त्याला त्याचा सामना खेळताना फायदा होईल. पण, जर फलंदाजांचा फलंदाजी क्रमांकच निश्चित नसेल आणि कर्णधार आपल्या इच्छेनुसार त्याला कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीस पाठवत असेल तर काय? अशा वेळी त्या फलंदाजाला प्रत्येक क्रमांकावर स्वत:ला सिद्ध करावे लागते.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असे फक्त ३ फलंदाज होऊन गेले आहेत, ज्यांनी सलामीपासून ते शेवटच्या ११व्या स्थानापर्यंत आपल्या फलंदाजीने स्वत:ला सिद्ध केले आहे. विशेष गोष्ट ही की, या ३ फलंदाजांमध्ये एक नाव हे भारताच्या माजी अष्टपैलू क्रिकेटपटूचे आहे, ज्याची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीही संघासाठी महत्त्वाची समजली जात होती. Vinoo Mankad is the only indian player who batted in the all number of positions.
सलामीपासून ते ११व्या स्थानापर्यंत फलंदाजी करणाऱ्या ३ क्रिकेटपटूंमध्ये इंग्लंडकडून ५८ कसोटी सामने खेळणारे विल्फ्रेड रोड्स, ऑस्ट्रेलियाकडून ५८ कसोटी सामने खेळणारे सिड ग्रेगोरी आणि भारताकडून ४४ कसोटी सामने खेळणारे विनू मंकड यांचा समावेश आहे.
गमतीची बाब अशी की, मंकड आणि रोड्स यांच्या २ गोष्टी समान होत्या. एक म्हणजे, दोघेही अष्टपैलू क्रिकेटपटू होते आणि दुसरी म्हणजे, दोघेही डाव्या हाताचे फिरकी गोलंदाज होते. रोड्स यांनी त्यांच्या ५८ कसोटी सामन्यात २ शतकांसह २३२५ धावा केल्या होत्या आणि १२७ विकेट्सही घेतल्या होत्या. तर, मंकड यांनी त्यांच्या ४४ कसोटी सामन्यात ५ शतकांसह २१०९ धावा केल्या होत्या आणि १६२ विकेट्स घेतल्या होत्या.
तर, ग्रेगोरी यांनी त्यांच्या ५८ कसोटी सामन्यात एक द्विशतक आणि ४ शतकांसह २२८२ धावा केल्या होत्या.
मंकड यांनी आपल्या पदार्पणाच्या २० वर्षांनंतर पहिल्यांदा भारताला कसोटी सामन्यात विजय मिळवून दिला होता. १९३२मध्ये कसोटीत पदार्पण केल्यानंतर त्यांनी १९५२मध्ये मद्रासमधील इंग्लंडविरुद्ध आपला पहिला विजय मिळवला होता. भारताने हा कसोटी सामना एका डाव आणि ८ धावांच्या जोरावर जिंकला होता. 5 players who batted in the most number of positions.
मंकड यांनी या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ५५ धावा देत ८ विकेट्स घेतल्या होत्या. तर, पूर्ण कसोटी सामन्यात १०८ धावा देत १२ विकेट्स घेतल्या होत्या. ही मंकड यांची एका डावातील आणि एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी होती.
मंकड यांना आठवले जाते, ते त्यांच्या कसोटीतील द्विशतकी विक्रमासाठी. ६ जानेवारी १९५६ला चेन्नईतील न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत त्यांनी हा कारनामा केला होता. यावेळी सलामीला फलंदाजी करत त्यांनी २१ चौकारांसह २३१ धावा केल्या होत्या. यासह त्यांच्या नावावर कसोटीत सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याच्या विक्रमाची नोंद झाली होती.
पुढे, जवळपास २ दशकांनंतर सुनील गावसकरने २३६ धावा करत त्यांचा विक्रम मोडला. पण, मंकड यांनी त्यांच्या या विक्रमासह अजून एक असा विक्रम केला होता, जो मोडण्यासाठी जगभरातील फलंदाजांना ५२ वर्षे लागली. हा विक्रम होता, पहिल्या विकेटसाठी जगतील सर्वाधिक धावांची भागीदारी करणे. मंकड आणि त्यांचे संघसहकारी पंकज रॉय यांनी मिळून ४१३ धावांची भागिदारी रचली होती.
हा विक्रम २००८मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या नील मॅकेंजी आणि ग्रीम स्मिथ यांनी मोडला. त्यांनी बांग्लादेशविरुद्धच्या कसोटीत ४१५ धावांची भागीदारी केली होती.
भारताचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री हे देखील ११वा क्रमांक सोडून कसोटीत सर्व क्रमांकावर खेळले. तर पाकिस्तानचे माजी खेळाडू नसीम उल घनी हे केवळ दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आले नाही. नाहीतर तेही बाकी सगळ्या क्रमांकावर फलंदाजीला आले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
भारताकडून खेळला केवळ ३ वनडे, आज आहे एका राज्याचा क्रीडामंत्री
केकेआरसह या तीन क्रिकेट टीमचा किंग खान होणार मालक
७०० विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणतो, रोहितला गोलंदाजी; नको रे बाबा