भारतीय संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आगामी वनडे विश्वचषकात खेळू शकणार नाही. मागच्या जवळपास एक वर्षापासून त्याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाहीये. अशात वेगवान गोलंदाजासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन नक्कीच सोपे दिसत नाही. असे असले तरी, गुरुवारी (7 सप्टेंबर) त्याने यूपी टी-20 लीगमध्ये आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली.
उत्तर प्रदेश टी-20 लीगमध्ये भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) नॉयडा सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. गुरुवारी या लीगमध्ये नॉयडा सुपर किंग्ज आणि कानपूर सुपरस्टार्स यांच्यात आमना सामना झाला. उभय संघांतील हा सामना 20 षटकांमध्ये बरोबरीत सुटला होता, त्यामुळे पंचांनी सुपर ओव्हरचा निर्णय घेतला. सुपर ओव्हरमध्ये नॉयडा संघासाठी नितीश राणा आणि ओशो मोहन फलंदाजीला आले आणि त्यांनी 6 चेंडूत 19 धावा केल्या. प्रत्युत्तरात कानपूरला विजायासाठी 20 धावा होत्या. पण त्यांचे फलंदाज कर्ण शर्मा आणि प्रिंस यादव यांनी हे लक्ष्य गाठता आले नाही. सुपर ओव्हरच्या 6 चेंडूंमध्ये कानपूर संघाला 11 धावांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, या सामन्यात भुवनेश्वर कुमारने केलेल्या गोलंदाजेच कौतुक होत आहे.
Kashi ho ya Kanpur – Batsmen Bhuvi ke aagey majboor!#UPT20 pic.twitter.com/VDiA6eu2qb
— FanCode (@FanCode) September 7, 2023
भुवनेश्वर कुमार याने या सामन्यात 4 षटके गोलंदाजी केली आणि 25 धावा करून महत्वाच्या 3 विकेट्स घेतल्या. कानपूरच्या डावातील पहिल्या, 17व्या आणि 19व्या षटकात भुवनेस्वरने हे झटके कानपूरला दिले. फॅनकोडच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. भुवनेश्वरने यूपी टी-20 लीगच्या चालू हंगामात आतापर्यंत पाच सामन्यात पाच विकेट्स घेतल्या आहेत.
वेगवान गोलंदाजाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द पाहिली तर त्याने भारतासाठी 21 कसोटी, 121 वनडे आणि 87 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान तिन्ही फॉरमॅटमध्ये स्टार्कने अनुक्रमे 63, 141 आणि 90 विकेट्स घेतल्या आहेत. भारतासाठी त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामने नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. तर कसोटी क्रिकेटमध्ये भुवनेश्वर जानेवारी 2018 नंतर पुन्हा एकदाही दिसला नाहीये. भारतीय संघासाठी त्याचे योगदान महत्वाचे राहिले असून आपल्या स्विंग गोलंदाजीच्या जोरावर जगभरातील दिग्गज फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या आहेत. अशात येत्या काळात भुवनेश्वर भारतीय संघात पुनरागमन करेल, अशा अपेक्षा चाहत्यांना आहेत. विश्वचषक संघात त्याचे नाव नसल्यामुळे त्याच्या चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आहे. (Vintage Bhuvneshwar Kumar with new ball & old Form in UP T20)
महत्वाच्या बातम्या –
पुन्हा दिसले धोनीचे टेनिसप्रेम! यूएस ओपनमधील व्हिडिओ व्हायरल, कार्लोस अल्कारेजच्या जवळ बसलाय भारतीय दिग्गज
विश्वचषकात भारताविरुद्ध ओपनिंगसाठी ‘या’ कांगारू अष्टपैलूचा वॉर्नरला भक्कम पाठिंबा; म्हणाला, ‘तो GOAT…’