श्रीलंकेचा महिला क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची टी२० आणि वनडे मालिका खेळली गेली आहे. श्रीलंकेला टी२० मालिकेत ३-०ने पराभूत व्हावे लागले होते, तर पहिले दोन वनडे सामनेही त्यांनी गमावले होते. वनडे मालिकाही क्लिन स्विप करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाला श्रीलंकेच्या कर्णधाराने चांगलेच उत्तर दिले आहे.
साउथएंड क्रिकेट क्लब, कराची येथे वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रंगला. या सामन्यात श्रीलंकेची कर्णधार चामारी अट्टापट्टूने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेची एक बाजू कोसळत असताना अट्टापट्टूने दुसरी बाजू लढवत धमाकेदार शतक केले आहे. यामध्ये तिला हर्षिता मादवीने उत्तम साथ दिली. अट्टापट्टूचे शतक आणि मादवीच्या ७५ धावांच्या जोरावर श्रीलंकेने ७ गडी गमावत २६० धावा केल्या.
अट्टापट्टूने या सामन्यात १०१ धावा केल्या आहेत. हे तिचे कारकिर्दीतील सहावे तर पाकिस्तान विरुद्धचे पहिले शतक ठरले आहे. या शतकाचा जल्लोष तिने मोठ्या जोशात साजरा केला, असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाकिस्तान क्रिकेटने त्यांच्या अधिकृत ट्विटरवर पोस्ट केला आहे.
डायना बेगच्या गोलंदाजीवर २९.४च्या षटकात अट्टापट्टूने एक धाव घेत शतक पूर्ण केले. यावेळी तिने बॅट हवेत फेकत शतकाचा आनंद साजरा केला. तिची बॅट हवेत ३-४ सेंकद राहिली. तिने हे शतक १३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ८२ चेंडूतच पूर्ण केले आहे.
Chamari Athapaththu's sixth ODI 💯 and her first against Pakistan 👏
Some celebration from the 🇱🇰 captain after reaching the milestone 💥
Watch Live ➡️ https://t.co/bOGW4Ouhmh
#⃣ #PAKWvSLW | #BackOurGirls pic.twitter.com/BzMdSKwj5U— Pakistan Cricket (@TheRealPCB) June 5, 2022
या लक्ष्याचा पाठलाग करण्यास फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाची सुरूवात अडखळतच झाली. त्यांची कर्णधार बिस्माह मारूफ भोफळा न फोडताच तंबूत परतली. आलिया रियाजने अर्धशतक करत सामना सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रीलंकन गोलंदाजाच्या माऱ्यापुढे पाकिस्तान ४१.४ षटकातच ढेर झाला. हा सामना श्रीलंकेने ९३ धावांनी जिंकला.
यावेळी अट्टापट्टूने फलंदाजी बरोबरच गोलंदाजीचही कमाल केली. तिने सहा षटकांमध्ये दोन विकेट्सही काढल्या. तर पाकिस्तानच्या सलामी जोडीला बाद करण्यात तिचा महत्वाचा वाटा होता. अष्टपैलू कामगिरी केल्याने तिला ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा पुरस्कार मिळाला.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘सावधान, आम्ही येतोय!’ मालिकेपूर्वी वेस्टइंडिजच्या कर्णधाराचा पाकिस्तान संघाला इशारा
रियान परागने हर्षल पटेलसोबतच्या वादाची सांगितली ईनसाईड स्टोरी, बघा काय म्हणाला तो?