भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा ही सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते. ती अनेकदा आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन असते. अशातच तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
डिसेंबर २०२० मध्ये, धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांचा विवाह सोहळा पार पडला होता. युजवेंद्र चहलच्या आयुष्यात एंट्री करण्यापूर्वीच धनश्रीने डान्सिंग क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. धनश्री एक उत्तम डान्सर आणि कोरियोग्राफर आहे. त्यामुळे ती आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमी डान्स करत असतानाचे व्हिडीओज शेअर करत असते, जे नेहमीच चाहत्यांच्या पसंतीचे ठरत असतात. नुकताच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक डान्स करत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती, साडी घालून जुन्या गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे.
शेअर केलेला व्हिडीओ ब्लॅक अँड व्हाईट असून धनश्री कपल डान्स करताना दिसून येत आहे. परंतु तिचा डान्स पार्टनर युजवेंद्र चहल नाहीये. या व्हिडिओमध्ये ती किशोर कुमार आणि मधुबाला यांच्या ‘चलती का नाम गाडी’ या चित्रपटातील सुप्रसिद्ध गाणं ‘एक लडकी भीगी भागी सी’ वर डान्स करत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शन आवडते शास्त्रीय संगीत असे लिहिले आहे. या व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पाडला जात आहे. तसेच अनेक चाहते आपल्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.
https://www.instagram.com/p/CPm8JUxpo5K/?utm_source=ig_web_copy_link
हा व्हिडीओ युजवेंद्र चहलने सुद्धा लाईक केला आहे.परंतु यावर त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाहीये. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतात. दोघेही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत चाहत्यांशी संवाद साधत असतात. विवाह झाल्याची गोड बातमी देखील दोघांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली होती.
युजवेंद्र चहलने आयपीएल २०२१ स्पर्धेत एकूण ७ सामने खेळले आहेत, यात त्याला ४ गडी बाद करण्यात यश आले होते. तसेच उर्वरित हंगाम सप्टेंबर महिन्यापासून युएई मध्ये खेळवण्यात येणार आहे. या हंगामात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीचा वारसा पुढे चालवण्यासाठी सज्ज आहे झारखंडचा हा युवा यष्टीरक्षक
परदेशी खेळाडूंना मोठा झटका! उर्वरित आयपीएलला नकार दिल्यास बीसीसीआय करणार ही कारवाई
दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांची ऑक्सिजन पातळी खालावली, आयसीयूमध्ये केले दाखल