Rohit Sharma :- भारताच्या वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या श्रीलंकेत वनडे मालिका खेळण्यात व्यस्त आहे. नुकताच भारतीय संघाने रोहितच्या नेतृत्त्वाखाली कोलंबोत श्रीलंकेविरुद्ध पहिला वनडे सामना खेळला, परंतु हा सामना बरोबरीत राहिला. आता भारतीय संघ पुढील दुसऱ्या वनडे सामन्यासाठी तयारी करत आहे. रविवारी (04 ऑगस्ट) कोलंबोत हा सामना होणार आहे. यादरम्यान रोहितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रोहितने चाहत्याच्या मुंबई इंडियन्सबद्दलच्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली.
झाले असे की या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी रोहित कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर पॅड वैगरे घालून सराव करण्यासाठी जात होता. त्यावेळी काही श्रीलंकन चाहते तिथे होते. त्यावेळी त्यांच्यामधून कोणीतरी ओडरलं की ‘यावेळी मुंबई इंडियन्स नाही.’ ते ऐकून रोहितलाही हसू आवरता आले नाही आणि त्यावर हसून प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, त्याच्या या प्रतिक्रियेनंतर अशी चर्चा सुरू झाली आहे की कदाचीत तो मुंबई इंडियन्ससाठी अखेरचा सामना खेळला आहे आणि आता तो पुन्हा या संघासाठी खेळणार नाही.
Today When Rohit Sharma was coming for practice session, A fan said to him ‘This time no Mumbai Indians ‘ and then Rohit Sharma passed a smile
His smile has confirmed that he had played his last match for Mumbai Indians pic.twitter.com/q0gS7Hr1Z3
— Vishu45 (@Ro_45stan) July 31, 2024
आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने रोहितला अचानक कर्णधारपदावरुन काढून टाकले होते आणि त्याच्याजागी अष्टपैलू हार्दिक पांड्या याची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून रोहित मुंबई इंडियन्सची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आयपीएल 2025 लिलावापूर्वीही रोहित मुंबई इंडियन्समधून बाहेर पडू शकतो. पण यावर रोहित किंवा मुंबई इंडियन्स किंवा इतर कोणाकडूनही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.
दुसरीकडे मुंबई इंडियन्सला रोहितला कोणत्याही किंमतीत संघात कायम ठेवायचे आहे, अशी वृत्ते येत आहेत. त्यामुळे आगामी आयपीएल हंगामात रोहित मुंबई इंडियन्समध्ये कायम राहतो की इतर फ्रँचायझीकडून खेळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा –
दीपिका कुमारीचं स्वप्न पुन्हा भंगलं, तिरंदाजीतील भारताचं आव्हान संपुष्टात
लक्ष्य सेनची ‘लक्षवेधी’ कामगिरी, ऑलिम्पिकच्या 128 वर्षांच्या इतिहासात असं करणारा पहिलाच भारतीय!
मोठी बातमी! ऑलिम्पिक दरम्यान भारतीय खेळाडूचा पॅरिसमध्ये कार अपघात, कुटुंबीयही होते सोबत