भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. लक्ष्य ऑलिम्पिकच्या 128 वर्षांच्या इतिहासात सेमिफायनलमध्ये पोहचणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला. शुक्रवारी (2 ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनल सामन्यात लक्ष्यनं चायनीज तैपेईच्या चौ तिएन चेनचा 19-21, 21-15, 21-12 असा पराभव केला. आता लक्ष्य पदक मिळवण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.
एक दिवसापूर्वीच भारताला बॅडमिंटन कोर्टवर दुहेरी धक्का बसला होता. देशासाठी पदकाची मोठी आशा असलेल्या स्टार शटलर पीव्ही सिंधूचं सलग तिसरं ऑलिम्पिक पदक हुकलं. तिला प्री-क्वार्टर फायनलमध्येच पराभवाला सामोरं जावे लागलं. तर पुरुष दुहेरीत सात्विक-चिराग या सुपरस्टार जोडीचाही धक्कादायक पराभव झाला. त्यांच आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं. अशा स्थितीत बॅडमिंटनमध्ये भारताची शेवटची आशा लक्ष्यवर आहे. त्यानं प्री-क्वार्टर फायनलमध्ये भारताच्याच एचएस प्रणॉयचा पराभव करून क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली होती.
क्वार्टर फायनलमध्ये लक्ष्यसमोरचं आव्हान सोपं. तो तैवानचा खेळाडू चाऊ तिएन चेनविरुद्ध 4 पैकी केवळ 1 सामना जिंकू शकला होता. या सामन्याची सुरुवातही लक्ष्यसाठी चांगली झाली नाही. चुरशीच्या लढतीत तैवानच्या खेळाडूनं पहिला गेम 21-19 असा जिंकला. यानंतर लक्ष्यनं आश्चर्यकारक पुनरागमन केलं आणि चाऊला सावरण्याची संधी दिली नाही. लक्ष्यनं पुढील दोन गेममध्ये तैवानच्या शटलरचे प्रयत्न हाणून पाडले आणि शक्तिशाली स्मॅश मारत सामना जिंकला.
हेही वाचा –
चक दे इंडिया! तब्बल 52 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलिया भारताकडून चारीमुंड्या चीत
मनू भाकर पदकांची हॅट्ट्रिक लगावणार! पॅरिस ऑलिम्पिकच्या आणखी एका फायनलमध्ये मारली धडक
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये राडा! ट्रान्सजेंडर बॉक्सरनं महिला बॉक्सरला अवघ्या 46 सेकंदात दिला धोबीपछाड