नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक फलंदाज असा शॉट मारताना दिसत आहे की, त्याच्या शाॅटने मागे ठेवलेली पाण्याची टाकी फुटते. याचा परिणाम असा होतो की, पाणी पटकन संपूर्ण खेळपट्टी पसरते. यादरम्यान फलंदाजाची रिएक्शन पाहण्यासारखी होती.
गेल्या काही दिवसापासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. आता या व्हिडिओला माजी भारतीय क्रिकेटर आणि सध्याचे समालोचक आकाश चोप्रा (Akash Chopra) यांनी आवाज दिला आहे. त्यावर कमेंट करून त्यांनी हा व्हिडिओ आणखी रंजक बनवला आहे.
दरम्यान या व्हिडिओमध्ये एक युवा क्रिकेटर नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. यादरम्यान तो बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न करतो. याच्या मागे जाळे नसल्यामुळे चेंडू थेट प्लास्टिकच्या टाकीवर आदळतो. चेंडूच्या वेगामुळे टाकी फुटते आणि संपूर्ण पाणी अचानक खेळपट्टीवर पसरते. यानंतर फलंदाज गोलंदाजाकडे पाहत असल्याचे दिसून येत आहे.
या व्हिडिओवर समालोचन करताना आकाश चोप्रा म्हणला, “सरळ हाताचा फलंदाज तयार आहे. भूमिकाही ठीक वाटते. पायावर चेंडू आणि एक चांगला झटका. अरे बाबा, हा टँक ब्रेकिंग शॉट आहे. तो एक अप्रतिम शॉट आहे. हा एक बेजोड शॉट आहे.”
Bar bar dekho, hazar bar dekho 👀🏏💥 #Aakashvani #Cricket pic.twitter.com/FmF9omEsh6
— Aakash Chopra (@cricketaakash) January 6, 2024
या व्हिडिओवर क्रिकेट चाहते मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. शनिवारपासून या व्हिडिओवर अनेक मीम बनवले जात आहेत. (Viral Video When it’s not your day Watch this unfortunate video of a cricketer)
हेही वाचा
Ball Tampering: भारताच्या दिग्गज गोलंदाजाची कबूली! पुर्वी सगळेच बॅाल कुरतडायचे, ‘पण पाकिस्तानी…’
Kieron Pollard: मुंबईच्या पोलार्डची वादग्रस्त इंस्टाग्राम पोस्ट, पाहा कुणावर साधलाय निशाणा