आज(16 ऑगस्ट) बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समीतीने वरिष्ठ भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची पुन्हा एकदा नियुक्ती केली आहे. मुंबईत घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.
भारतीय संघासाठी मुख्य प्रशिक्षकाची निवड करणाऱ्या सल्लागार समीतीमध्ये भारताचे माजी कर्णधार कपिल देव, माजी महिला कर्णधार शांता रंगास्वामी आणि माजी प्रशिक्षक अंशुमान गायकवाड यांचा समावेश आहे. हे तिघेही या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते.
यावेळी त्यांना प्रशिक्षकाची निवड करताना भारतचा कर्णधार विराट कोहलीचे मत विचारात घेतले होते का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर कपिल देव म्हणाले, ‘नाही, कारण आम्ही जर विराटचे मत विचारात घेतले असते तर आम्ही संपूर्ण संघाचेही मत विचारात घेतले असते. आम्ही कोणालाही विचारले नाही. त्यासाठी कोणतीही संधी नव्हती.’
मुख्य प्रशिक्षक म्हणून शास्त्रींची निवड करण्याआधी सल्लागार समीतीने प्रशिक्षकपदासाठी अंतिम 5 जणांची निवड करण्यात आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या.
तसेच याआधी या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने शास्त्रींसह माईक हेसन, टॉम मूडी, फिल सिमन्स, लालचंद राजपूत आणि रॉबिन सिंग यांची अंतिम उमेदवार म्हणून निवड केली होती. पण मुलाखतीआधी सिमन्स यांनी माघार घेतली. त्यामुळे अन्य पाच जणांच्याच मुलाखती घेण्यात आल्या.
त्यातील शास्त्री, हेसन आणि मूडी यांची पहिल्या तीनमध्ये निवड झाली. पण अखेर या सर्वांमध्ये शास्त्रींनी बाजी मारली.
याबद्दल कपिल देव म्हणाले, ‘तिसऱ्या क्रमांकावर टॉम मूडी होते, दुसऱ्या क्रमांकावर माईक हेसन होते आणि तूम्ही सर्वांनी अपेक्षा केल्याप्रमाणे रवी शास्त्री अव्वल क्रमांकावर आले. पण ही खूप अटीतटीची शर्यत होती. शास्त्रींच्या प्रेसेंटेशनमध्ये त्यांनी मागील दोन वर्षात काय केले आणि भारतीय संघाचा पुढे जाण्याचा मार्ग, या गोष्टी होत्या.’
तसेच सल्लागार समीतीचे सदस्य अंशुमान गायकवाड शास्त्रींबद्दल म्हणाले, ‘मुळात ते सध्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक असल्याने ते सर्व खेळाडूंना ओळखतात. संघातील समस्या त्यांना माहित आहेत आणि संघात काय करायला पाहिजे हे देखील त्यांना माहित आहे. त्यांना सर्व प्रणाली(सिस्टिम) माहित आहे.’
‘जर कोणाला सर्व प्रणाली माहित असेल, सर्व खेळाडूंना ते ओळखत असतील आणि संवाद साधू शकत असतील तर मला वाटते हे फायद्याचे आहे.’
शास्त्रींचा हा भारतीय संघाबरोबरचा एकूण चौथा कार्यकाळ असणार आहे. त्यांनी 2007 च्या बांगलादेश दौऱ्यात भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. तसेच 2014-2016 दरम्यान ते संघ संचालक होते. त्यानंतर 2017-2019 मुख्य प्रशिक्षक होते आणि आता पुन्हा एकदा त्यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे.
https://twitter.com/BCCI/status/1162371974313598976
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–या एका शब्दात श्रेयस अय्यरने केले स्वत:च्या खेळीचे कौतुक, पहा व्हिडिओ
–मोठी बातमी – रवी शास्त्रींची पुन्हा एकदा टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती
–बोल्टच्या हेल्मेटमध्ये अडकला चेंडू आणि मग जे घडले ते पाहून कुणालाही हसू लपवता आले नाही!






