भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने आठ धावांनी विजय संपादन केला. यासह भारतीय संघाने मालिकेत विजयी आघाडी घेतली. फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. भारतीय संघाने या सामन्यात विजय मिळवला असला तरी, या सामन्यात घडलेल्या एका घटनेमुळे कर्णधार रोहित शर्मा हा माजी कर्णधार विराट कोहली याचा सल्ला देखील मानतो हे दिसून आले.
रोहितने मानला विराटचा सल्ला
विराट कोहलीने टी२० विश्वचषकानंतर आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर, दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी त्याला वनडे कर्णधारपदावरून हटविण्यात आले. तसेच, विराटने कसोटी कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. त्यानंतर, रोहित शर्माकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले. रोहित संघाचा कर्णधार असला तरी विराट अनेकदा त्याला मैदानावर सल्ला देताना दिसून येतो. याचाच प्रत्यय शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात आला.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १८६ धावा काढल्या होत्या. त्याचा पाठलाग करण्यासाठी ब्रेंडन किंग व कायले मायर्स ही जोडी वेस्ट इंडीजसाठी मैदानात उतरली. त्यांनी संघाला सावध मात्र आश्वासक सुरुवात करून दिली.
वेस्ट इंडीजच्या डावातील सहावे षटक टाकण्यासाठी कर्णधार रोहित शर्माने वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याला पाचारण केले. मात्र, त्याच वेळी विराट कोहलीने पुढे येत चहलला गोलंदाजी देण्याची विनंती केली. विराटच्या या निर्णयाला सूर्यकुमार यादव यानेदेखील संमती दर्शवली. त्यानंतर रोहितने चहलला गोलंदाजी दिली. चहलनेही मायर्सला पहिल्याच चेंडूवर बाद करत विराटचा व कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. यापूर्वीदेखील वनडे मालिकेत विराटने रोहितला क्षेत्ररक्षण सजवण्यात मदत केलेली दिसून आलेली.
महत्वाच्या बातम्या-
विराटने सोडली ‘टीम इंडिया’ची साथ! मालिकेच्या अर्ध्यातून परतला घरी; वाचा सविस्तर (mahasports.in)
पॉवेल फटकेबाजी करताना खूश होत होता पंत! वाचा संपूर्ण प्रकरण (mahasports.in)