भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज म्हटले जाते. ७० आंतरराष्ट्रीय शतके झळकावणार्या विराटला आपल्या ७१ व्या शतकासाठी खूप वाट पहावी लागत आहे. तो मागील ४७८ दिवसांपासून आंतरराष्ट्रीय शतक झळकावू शकला नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिले. मात्र, त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. टी२० मालिकेत तीन नाबाद अर्धशतके ठोकून त्याने मालिकावीर पुरस्कार आपल्या नावे केला.
आपला आंतरराष्ट्रीय शतकांचा दुष्काळ संपविण्याची संधी त्याला २३ मार्च पासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत मिळेल. तीन सामन्यांची ही मालिका पुणे येथे खेळली जाईल. विराटने या मालिकेत शतक साजरे केले तर, तो अनेक विक्रमांना गवसणी घालेल. आपण, अशाच तीन विक्रमांविषयी जाणून घेणार आहोत.
१) रिकी पॉंटिंगचा विक्रम टाकणार मागे
इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत एक शतक झळकावून विराट कोहली ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पॉंटिंग याला मागे सोडेल. कर्णधार म्हणून पॉंटिंगने आंतरराष्ट्रीय सामन्यांत ४१ शतके ठोकली आहेत. विराटने देखील कर्णधार म्हणून इतकीच शतके झळकावली असून, एक शतक ठोकून तो या यादीत पहिल्या क्रमांकावर येईल.
२) सचिनची करणार बरोबरी
विराट कोहली पुणे येथील वनडे सामन्यांत एक शतक झळकावू शकला तर, भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडूलकर याची बरोबरी करेल. सचिनने मायदेशात खेळताना वनडे क्रिकेटमध्ये २० ठोकली आहेत. दुसरीकडे, विराटने आतापर्यंत भारतात १९ वनडे शतके साजरी केली असून, आणखी एका शतकासह तो याबाबतीत सचिनची बरोबरी करताना दिसेल.
३) युवराजसोबत करणार ‘या’ बाबतीत बरोबरी
विराटने आगामी वनडे मालिकेत शतक ठोकले तर तो इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक वनडे शतके ठोकणार्या युवराज सिंगशी बरोबरी करेल. युवराजने इंग्लंड विरुद्ध ४ शतके झळकावली होती. तर, विराट ३ शतकांसह दुसऱ्या स्थानी आहे.
महत्वाच्या बातम्या:
अद्वितीय! युवराजच्या कारकिर्दीला लाभली सोनेरी किनार, उंचावली आणखी एक ट्रॉफी
अन् दस्तरखुद्द आनंद महिंद्रा यांनी शब्द पाळला; सोशल मीडियावर होतंय कौतुक
विजेत्या इंडिया लीजेंड्सचे हॉटेल स्टाफतर्फे जंगी स्वागत, युवीचा झक्कास डान्स लावेल वेड; पाहा व्हिडिओ