कोरोना महामारीचा उद्रेक संपूर्ण भारत देशात दिवसेंदिवस वाढू लागला आहे. कोरोनाची परिस्थिती पाहून सर्वसामान्यांसह देशातील सर्व सेलेब्रिटीसुद्धा पुढे येऊन लोकांना मदत करताना दिसतायेत. आता बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीही या यादीमध्ये सामील झाले आहेत. या दाम्पत्याने भारतातील कोरोना मदत कार्यांसाठी निधी उभारण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून अवघ्या पाच दिवसात सुमारे ११ कोटी रुपये उभे केले आहेत.
कोहली आणि अनुष्का यांनी स्वतः दोन कोटी रुपयांची मदत केली आहे. या मोहिमेमधून संकलित केलेला निधी कोरोना मदत कार्यांसाठी ऍक्ट ग्रँट संस्थेला दिला जाईल. क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्म किटो अंतर्गत त्यांनी सात कोटी रुपये उभे करण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. परंतु, लोकांनी भरभरून मदत केल्याने अधिक निधी जमा झाला. विराट कोहली ब्रँड ॲम्बेसिडर असलेल्या एमपीएल स्पोर्ट्स फाऊंडेशनने पाच कोटी रुपयांची मदत केली.
ऑक्सिजन व इतर वैद्यकीय सुविधा पुरवण्याच्या क्षेत्रात ऍक्ट ग्रँट संस्था काम करते. ही मोहीम सुरू करताना अनुष्का म्हणाले होते की, सध्या आपला देश एक कठीण अवस्थेतून जात आहे. आपल्या देशासाठी आपल्या सर्वांना एकत्र येण्याची आणि अधिकाधिक लोकांचे जीवन वाचवण्याची गरज आहे. विराटने म्हटले होते की, गेल्या एक वर्षापासून लोकांचे हाल पाहून मला आणि अनुष्काला अतिव दुःख झाले आहे.
पॅट कमिन्सने केली होती सुरुवात
भारतातील कोरोनाचा प्रकोप पाहता ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने सर्वप्रथम ५० हजार अमेरिकन डॉलर्सची मदत केली होती. त्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाने १ मिलियन अमेरिकन डॉलर्स या कार्यासाठी देऊ केलेले. सनरायझर्स हैदराबादने देखील ३० कोटी रुपये वैद्यकीय सुविधांसाठी दिले आहेत. याव्यतिरिक्त अनेक भारतीय आणि विदेशी क्रिकेटपटूंनी देखील आपापल्या परीने नागरिकांची मदत केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहली ‘या’ बाबतीत नेहमीच हरतो, शुबमन गिलने केला खुलासा
कुलदीपला येतेय एमएस धोनीची आठवण, म्हणाला, “माही भाईच्या मार्गदर्शनची कमी जाणवते, कारण…”
आम्ही चालवू पुढे वारसा! नबीच्या मुलाने ठेवले वडिलांच्या पावलावर पाऊल, केली षटकारांची आतिषबाजी