आशिया चषक २०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी सर्व संघ युएईला पोहोचले आहेत. भारत आणि पाकिस्तान संघांनी युएईत सरावालाही सुरुवात केली आहे. यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा व वरिष्ठ फलंदाज विराट कोहली यांनीदेखील आपले हात खुले गेले. बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया हँडलवर या दोघांचा सराव करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांची पसंती लाभताना दिसतेय.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सुरवातीला रोहित फलंदाजी करताना दिसतोय. रोहित यात कट, पुल आणि स्विपचे फटके मारताना दिसून येतोय. त्यानंतर विराट कोहली फलंदाजीला येत कव्हर ड्राईव्ह आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटके मारताना दिसून आला. या दोघांनाही संघाचा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा, प्रमुख फिरकीपटू रविचंद्रन अश्विन व युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग गोलंदाजी करताना दिसतायेत.
https://www.instagram.com/reel/ChrzGJBjjDd/?igshid=YmMyMTA2M2Y=
आशिया चषकात (Asia Cup 2022) भारत आणि पाकिस्तान संघ अ गटात आहेत. उभय संघातील पहिला सामना २८ ऑगस्टला दुबईत होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ जवळपास १० महिन्यांपूर्वीचा वचपा काढण्यासाठी प्रयत्नशील असेल. टी२० विश्वचषक २०२१ मध्ये पाकिस्तानकडून मिळालेल्या पराभवाची परतफेड करण्याची हीच भारताकडे चांगली संधी असणार आहे.
आशिया चषक २०२२ साठी भारत संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.
स्टँडबाय: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकातील ‘हे’ विक्रम मोडणे नाहीये सोपे, सेहवागने केलाय गोलंदाजीत अजब कारनामा
भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानचा सर्वात अवघड ‘पेपर फुटला’, महत्वाच्या फलंदाजाची कमजोरी झाली उघड
हरभजनला मारायला हॉटेलच्या रूमपर्यंत गेलेला अख्तर, ‘या’ गोष्टीमुळे पेटला होता वाद