---Advertisement---

प्रथम देश, मग मी! विराटच्या एका कृतीने कार्तिक फॅन्ससह देशाला केलं भावनिक

On: रविवार, ऑक्टोबर 2, 2022 9:36 PM
---Advertisement---

भारत व दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचा दुसरा टी20 सामना गुवाहाटी येथे सुरू झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय भारतीय फलंदाजांनी पुरता चुकीचा ठरवत 3 बाद 237 धावा उभारल्या. अनुभवी विराट कोहलीने आशिया चषकापासून असलेला आपला फॉर्म सिद्ध कायम राखत नाबाद 49 धावा केल्या. यादरम्यान त्याने एक अशी कृती केली ज्याचे सोशल मीडियावर तुफान कौतुक होत आहे.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना फलंदाजी केलेल्या पाचही फलंदाजांच्या खेळाच्या जोरावर 3 बाद 237 धावा काढल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीने सुरुवात काहीशी धीमी केल्यानंतर जोरदार फटकेबाजी केली. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 28 चेंडूवर 49 धावा केल्या. यात 7 चौकार व एका षटकाराचा समावेश होता.

 

यादरम्यान भारतीय डावाचे दोन चेंडू शिल्लक असताना विराट कोहलीने केलेली कृती सर्वांचे मन जिंकणारी ठरली. त्यावेळी विराट नॉन स्ट्राइकला होता. तोपर्यंत विराटने 49 धावा केलेल्या. दिनेश कार्तिक चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करत होता. मात्र, विराटने अर्धशतक करावे यासाठी दिनेश कार्तिकने त्याला स्ट्राइक देऊ का असे विचारले. त्यावर विराटने अतिशय प्रामाणिकपणे नको तू मोठे फटके खेळ असा इशारा केला. कार्तिक नेत्यानंतर शानदार षटकार खेचत धावगती वाढवली. विराटच्या या कृतीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

अनेक जण त्याचे कौतुक करताना थकत नाहीयेत. विराट हा नेहमीच देशाला प्राधान्य देतो असे म्हटले जात आहे. तसेच एकाने याच कारणाने विराट सर्वोत्कृष्ट आहे असे देखील म्हटले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सरफराज खानची ‘फर्स्ट क्लास’ इनिंग, ब्रॅडमन यांना टाकले मागे!
पाकिस्तानच्या सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूची आईदेखील उतरली क्रिकेटच्या मैदानात; मुलीने पोस्ट करत लिहिले…
तिसऱ्या पंचांच्या निर्णयामुळे युवराज सिंग नाराज, पूजा वस्त्राकरला गमवावी लागली विकेट

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---