आयपीएल २०२१ चा १६ वा सामना गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू झाला आहे. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून राजस्थानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, नाणेफेकीदरम्यान उभय कर्णधारांदरम्यान एक मजेदार घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ अल्पावधीतच व्हायरल होऊ लागला आहे.
अशी घडली मजेदार घटना
आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन या सामन्याच्या नाणेफेकीसाठी मैदानात उतरले. विराट कोहलीने नाणे उडवले आणि संजूने टेल (काटा) असा कॉल केला. सामनाधिकारी जगजीत सिंग यांनी हेड (छापा) पडला असल्याचे जाहीर केले. मात्र विराटला वाटले नाणेफेक संजूने जिंकली आणि त्याने संजूला समालोचक इयान बिशप यांच्यासोबत बोलण्यासाठी पुढे केले. संजू पुढे देखील आला. परंतु, तत्काळ त्याच्या लक्षात आले की नाणेफेक विराटने जिंकली आहे आणि त्याने विराटला याबाबत कल्पना दिली.
https://twitter.com/IPL/status/1385226909353615364?s=19
विराटने हसत हसत पुढे येत “मला नाणेफेक जिंकण्याची सवय नाही” असे म्हटले आणि एकच हशा पिकला. त्यानंतर विराटने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय सांगितला.
पहिल्या सामन्यातही विराट झाला होता चकित
मुंबई इंडियन्स विरुद्ध हंगामातील पहिल्या सामन्यात देखील काहीशी अशी घटना घडली होती. या सामन्यात देखील विराटने नाणेफेक जिंकली आणि स्वतःच चकित झाला. विराटचा नाणेफेकीमध्ये चांगला इतिहास नाही. तो अनेकदा यापूर्वी नाणेफेक हरला आहे.
या सामन्यासाठी दोन्ही संघ-
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पद्धिकल, शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, काईल जेमीसन, केन रिचर्डसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.
राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, मनन वोहरा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाळ, चेतन सकारिया, मुस्तफिजुर रहमान.
महत्त्वाच्या बातम्या –
टी नटराजनच्या दुखापतीबद्दल हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती