देशातील सर्वात उंच क्रिकेट स्टेडियम हिमाचल प्रदेशच्या आदिवासी जिल्हा लाहौल-स्पीती येथील सिसू येथे बांधले जाईल. यासाठीचा, प्रथम अडथळा पार केला गेला आहे. स्थानिक पंचायत व महसूल विभागाने स्टेडियमसाठी ३८ बीघा जागेचे सीमांकन करून फाईल वनविभागाकडे पाठविली आहे. वनविभाग आता राज्य सरकारच्या पत्राच्या प्रतीक्षेत आहे. स्टेडियमसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.
लाहौल-स्पिती जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र ठाकूर म्हणाले की, “७ वर्षांपूर्वी सिसूमध्ये स्टेडियम बांधणी याविषयी चर्चा सुरू झाली होती. कुल्लू जिल्ह्यातील रोहतांगमधील अटल बोगद्याच्या उत्तर टोकापासून अवघ्या आठ किमी अंतरावर ११००० हजार फूट उंचीवर प्रस्तावित हे क्रिकेट स्टेडियम देशातील सर्वात उंच क्रिकेट स्टेडियम असेल. यामध्ये १०,००० प्रेक्षकांची क्षमता असेल. सद्यस्थितीत सोलनच्या चायल येथे देशातील सर्वात जास्त उंचीवरील क्रिकेट स्टेडियम आहे, जे ७५०० फूट उंचीवर आहे. हे स्टेडियम पटियालाचे महाराजा भूपेंद्र सिंह यांनी १८९१ मध्ये बांधले होते. सिसू स्टेडियम देणगीच्या पैशाने बांधले जाईल.”
त्याचवेळी जिल्हा क्रीडा अधिकारी व केलॉंगचे एसडीएम राजेश भंडारी म्हणाले की, “सिसू तलावाजवळ क्रिकेट स्टेडियमच्या बांधकामासाठी ३८ बीघा जमीन लाहौल-स्पिती जिल्हा क्रिकेट संघटनेला देण्यात आली आहे. हे स्टेडियम राज्याचे कॅबिनेट मंत्री डॉ. रामलाल मार्कंडा यांच्या प्राधान्याने होत आहे. सरकार लवकरच स्टेडियमच्या बांधकामाचे हेतूपत्र देणार असून भूसंपादनाची फाइल देहरादूनला पाठविली जाईल.”
पाऊस आणि तीव्र उन्हामुळे एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत देशांतर्गत क्रिकेट सामने आयोजित केले जात नाहीत. या काळात, लाहौल खोऱ्यात तापमान २० ते २५ अंश असते आणि तेथे पाऊसही अत्यंत कमी असतो. अशा परिस्थितीत सिसूमध्ये युरोपियन देशांच्या धर्तीवर क्रिकेट खेळता येऊ शकते. सध्या देशातील सर्वात उंचीवरील आंतरराष्ट्रीय स्टेडियम धर्मशाला येथे आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी नटराजनच्या दुखापतीबद्दल हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती
RCB vs RR : आरसीबीसाठी ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण? अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन






