---Advertisement---

RCB vs RR : आरसीबीसाठी ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण? अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

On: गुरूवार, एप्रिल 22, 2021 6:05 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ चा १६ वा सामना गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आयसीसी) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणार आहे. गुरूवारी (२२ एप्रिल) सायंकाळी साडेसात वाजल्यापासून हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीने या हंगामात एकही सामना गमावला नाही. त्यांनी आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि तिन्ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत तीन सामन्यांपैकी त्यांना फक्त एक विजय मिळविता आला आहे. गुणतालिकेत आरसीबी दुसर्‍या आणि राजस्थान सातव्या क्रमांकावर आहे.

गुरुवारच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होऊ शकतात. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू डॅनियल सॅम्सचा कोरोना अहवाल नकारात्मक आल्यावर संघात सामील झाला आहे. केकेआरविरुद्धच्या सामन्यात आरसीबी अवघ्या तीन परदेशी खेळाडूंसह खेळला होता. अशा परिस्थितीत डॅनियल सॅम्सला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकेल.

देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहली पुन्हा एकदा सलामी देतील. ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांचेही संघातील स्थान अबाधित आहे. गोलंदाजीबद्दल बोलताना कायले जेमिसन व हर्षल पटेल वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करतील. युझवेंद्र चहलला फिरकीपटू म्हणून संघात स्थान मिळेल.

राजस्थान रॉयल्सच्या प्लेईंग इलेव्हनबाबत बोलायचं झाल्यास, सलामीवीर मनन वोहराच्या जागी यशस्वी जयस्वालला संधी दिली जाऊ शकते. जोस बटलर पुन्हा एकदा राजस्थानसाठी सलामी देईल. डेव्हिड मिलरचे स्थानदेखील नक्की आहे. शिवम दुबेच्या जागी महिपाल लोमरोरला खेळविण्यात येऊ शकते. प्लेइंग इलेव्हनमध्ये ख्रिस मॉरिस, जयदेव उनाडकट, चेतन साकारिया व मुस्तफिझुर रहमान यांना गोलंदाज म्हणून संघात स्थान मिळू शकते.

आरसीबीची संभावित प्लेइंग इलेव्हन-
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, शाहबाझ अहमद, डॅनियल सॅम्स, कायले जेमिसन, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, वॉशिंग्टन सुंदर.

राजस्थान रॉयल्सची संभावित प्लेइंग इलेव्हन-
यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार), महिपाल लोमरोर, डेव्हिड मिलर, रियान पराग, ख्रिस मॉरिस, राहुल तेवतिया, चेतन साकरिया, जयदेव उनाडकट, मुस्तफिझुर रहमान.

महत्त्वाच्या बातम्या –

केकेआरविरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वी धोनीने गोलंदाजांना दिला होता ‘हा’ कानमंत्र, स्वतः केला खुलासा

गोलंदाज करत असलेल्या ‘या’ चूकीवर भडकले सुनील गावसकर; म्हणाले…

“आरसीबीमध्ये सामील झालेल्या पहिल्या दिवसापासून वाटते की मी माझ्या घरात आहे”, दिग्गज खेळाडूची प्रतिक्रिया 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---