---Advertisement---

किंग कोहलीला ‘तो’ खास विक्रम मोडण्यासाठी हव्या फक्त ६७ धावा

---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ प्रत्येकी एक-एक सामना जिंकत बरोबरीत आहेत. यातील तिसरा आणि निर्णायक सामना उद्या (18 जनेवारी) मेलबर्न येथे खेळला जाणार आहे.

या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीला एक खास विक्रम करण्याची संधी आहे. या सामन्यात जर विराटने 67 धावा केल्या तर तो विंडीजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लारा यांना वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत मागे टाकू शकतो.

लारा यांनी 299 वन-डे सामन्यात 10405 धावा केल्या आहेत. विराटने 218 वन-डे सामन्यात 10339 धावा केल्या आहेत.

त्याचबरोबर विराटने या 67 धावा केल्या तर तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या दहामध्ये सामील होऊ शकतो. सध्या तो अकराव्या क्रमांकावर आहे.

वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे पहिले दहा फलंदाज-

1)  सचिन तेंडुलकर – 18426 धावा (463 सामने)

2)  कुमार संघकारा – 14234 धावा (404 सामने)

3)  रिकी पॉटींग –     13704 धावा (375 सामने)

4)  सनथ जयसुर्या – 13430 धावा (445 सामने)

5)  माहेला जयवर्धने – 12650 धावा (448 सामने)

6)  इंजमाम-उल-हक – 11739 धावा (378 सामने)

7)  जॅक कॅलिस –    11579 धावा (328 सामने)

8)  सौरव गांगुली –  11363 धावा (311 सामने)

9)  राहुल द्रविड –  10889 धावा (344 सामने)

10) ब्रायन लारा – 10405 धावा (299 सामने)

11) विराट कोहली – 10339 धावा (218 सामने)*

महत्त्वाच्या बातम्या-

मेलबर्न वनडे जिंकून टीम इंडियाला ऑस्ट्रेलियामध्ये इतिहास रचण्याची संधी

देशांतर्गत क्रिकेटचा बादशाह झाला सचिन, द्रविडसारख्या दिग्गजांच्या यादित सामील

संघाचा समतोल राखण्यासाठी हार्दिक पंड्या संघात हवा, भारताच्या खेळाडूने मांडले मत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment