---Advertisement---

‘विराट हा रोहितपेक्षा मोठा फलंदाज, त्याला पुन्हा कर्णधार बनवायला हवे…’, माजी खेळाडूचे धक्कादायक विधान

On: रविवार, डिसेंबर 31, 2023 11:18 AM
Virat-Kohli-And-Rohit-Sharma
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या पराभवानंतर माजी फलंदाज सुब्रमण्यम बद्रीनाथ याने रोहित शर्मा याच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहित शर्माऐवजी विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार असावा असे त्याने म्हटले आहे. सुब्रमण्यम बद्रीनाथ याच्या मते, विराट कोहली हा मोठा फलंदाज आहे आणि कसोटी सामन्यांमध्ये त्याचा रेकॉर्डही खूप चांगला राहिला आहे. तो म्हणाला की, “रोहितने भारताबाहेर सलामीवीर म्हणून स्वत:ला सिद्ध केलेले नाही.”

रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. याशिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी सामनाही संघ हारला आहे. या काळात रोहित शर्माची फलंदाजीमध्ये कामगिरी तितकीशी चांगली नव्हती आणि त्यामुळेच सुब्रमण्यम बद्रीनाथ यांनी त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सुब्रमण्यम बद्रीनाथ (Subramaniam Badrinath) याच्या मते, कर्णधार म्हणून विराट कोहली (Virat Kohli) याचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे, तर रोहित शर्मा स्वत:ला सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना तो म्हणाला, “कसोटी संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीचा विक्रम चांगला आहे. कर्णधार म्हणून त्याने 52 च्या सरासरीने 5000 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 68 पैकी 40 कसोटी सामने जिंकले आणि 17 सामने गमावले. ऑस्ट्रेलिया मालिकेत त्याने संघाला नेत्रदीपक विजय मिळवून दिला होता. रिकी पाँटिंग, ग्रॅम स्मिथ आणि स्टीव्ह वॉ यांच्यानंतर विराटने कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी सामने जिंकले आहेत. तर मग विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार का नाही? तो अधिक चांगला कसोटी फलंदाज आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात तुलना नाही. मात्र विराट हा कसोटी क्रिकेटमधील मोठा खेळाडू आहे. त्याने सर्वत्र धावा केल्या आहेत. मग त्याच्याऐवजी कमकुवत खेळाडू संघाचे नेतृत्व का करत आहे?” (Virat is a bigger batsman than Rohit, he should be made captain again a shocking statement from the former player)

हेही वाचा

IND vs SA: ‘राहुल-विराटशिवाय कोणीही..’, सेंच्युरियनमधील भारताच्या पराभवावर माजी क्रिकेटपटूचे मोठे विधान
‘या’ 3 संघांना भारताने सर्वाधिक वेळा कसोटी सामन्यांमध्ये केलेय पराभूत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---