भारतीय संघाचा (team india) माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली (virat kohli) मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये त्याच्याकडून भारतीय संघाचे तिन्ही प्रकारांमधील कर्णधारपद निघून गेले आहे. त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशात भारताचे महान कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी त्याची पाठराखण केली आहे. गावसकरांच्या मते विराट फॉर्ममध्ये आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सध्या तीन सामन्यांची मायदेशातील एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. एकदिवसीय मालिकेतही विराटचे प्रदर्शन निराशाजन होते. एकेकाळी विराटला सचिन तेंडुलकरचा १०० शतकांचा विक्रम मोडण्यासाठी दावेदार मानले जात होते. परंतु मागच्या दोन वर्षात त्याच्या बॅटमधून एकही शतक निघाले नाही. असे असले तरी सुनील गावसकरांचे मत असे आहे की, विराटचे फक्त नशीब खराब आहे आणि प्रत्येक फलंदाजाला नशिबाची साथ गरजेची असते. वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट १८ धावा करून बाद झाला. त्यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले गेले. अशात गावसकरांनी त्याची पाठराखण केली आहे.
कोहलीला थोडी नशिबाची साथ हवी आहे
स्टार स्पोर्ट्सशसी बोलताना गावसकर म्हणाले की, “प्रत्येक फलंदाजाला सामन्यात थोड्या नशीबाची गरज असते. प्रत्येक फलंदाजाला एशा परिस्थितीची गरज असते, जेव्हा प्रयत्न करतो की चेंडू बॅटला स्पर्श न करता यष्टीरक्षकाच्या हातात जावा. प्रत्येक गोलंदाजाला अशा परिस्थितीची गरज असते, जेथे चेंडू बॅटला लागून क्षेत्ररक्षकाच्या आधी जमिनीवर पडावा किंवा क्षेत्ररक्षकाने त्याचा झेल सोडावा. मागच्या काही सामन्यांमध्ये असे नशीब विराटची साथ देत नाहीय. त्याने दक्षिण अफ्रिकेमध्ये अर्धशतके ठोकले होते, हे विसरले नाही पाहिजे.”
रोहित विराट यांच्यातील संबंधांवरही बोलले गावसकर
विराटनंतर रोहित शर्माला भारताच्या टी२० आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवले गेले आहे. अशात चाहत्यांमध्ये असा समज निर्माण झाला आहे की, रोहित आणि विराट यांच्यात सर्वकाही ठीक नाही. गावसकरांनी या सर्व बातम्या आणि अफवा चुकीच्या असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, “अनेकदा असे सांगितले जाते की, एक खेळाडू जो आधी कर्णधार होता, तो नवीन कर्णधाराला यशस्वी होताना पाहू इच्छित नाही. हा मुर्खपणा आहे, कारण जर त्याने धावा केल्या नाहीत किंवा गोलंदाजाने विकेट घेतल्या नाहीत, तर तो संघातून बाहेर होईल.”
महत्वाच्या बातम्या –
IPL 2022: केव्हा, कुठे आणि कधी पाहू शकता लिलाव, कोणाकडे किती पैसे? जाणून घ्या सर्वकाही
अजिंक्य रहाणेचा आणखी एक सनसनाटी आरोप! वनडे कारकीर्दीविषयी म्हणाला…
भारताच्या आजी-माजी कर्णधारांची घोर निराशा, संपूर्ण मालिकेत विंडीजच्या ‘या’ गोलंदाजाचे बनले गिऱ्हाईक