आयसीसी वनडे विश्वचषक 2023 पुरुस्कार विराट कोहली याला मिळाला. विराटने मागच्या वर्षी वनडे विश्वचषक स्पर्धेत इतर कोणत्याही फलंदाजापेक्षा जास्त धावा केल्या होत्या. इतरही काही मालिका त्याने गाजवल्या. याच पार्श्वभूमीवर त्याला गुरुवारी (25 जानेवारी) हा मानाचा पुरस्कार मिळाला. आयसीसीकडून विराटला वनडे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार मिळण्याची ही चौथी वेळ आहे. हा सन्मान मिळताच त्याच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला गेला.
विराट कोहली भारतीय संघाचा माजी कर्णधार असून त्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आपला झाप सोडली आहे. मागच्या वर्षी वनडे विश्वचषक खेळला जाणार होता. याच पार्श्वभूमीवर सर्वच संघ वनडे क्रिकेट प्रामुख्याने खेळले. अशात वनडे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी स्पर्धा देखील वाढली. पण विराटने हा पुरस्कार मिळवला. त्याने वनडे विश्वचषक 2023 मध्ये सर्वाधिक 765 धावा केल्या होत्या. यामध्ये 3 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश होता. आयसीसी वनडे प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार मिळाल्यानंतर हा त्याला मिळालेला आयसीसीचा 10 वा पुरस्कार ठरला. आयसीसीचे 10 पुरस्कार स्वीकारणारा विराट पहिलाच खेळाडू आहे.
विराटने जिंकलेले 10 आयसीसी पुरस्कार
क्रिकेट ऑफ द डिकेड अर्थात दशकातील सर्वोत्तम क्रिकेटर (2010)
वनडे प्लेअर ऑफ द डिकेड अर्थात दशकातील सर्वोत्तम क्रिकेटर (2010)
वनडे क्रिकेटर ऑफ द ईअर (2012)
क्रिकेटर ऑफ द ईअर (2017)
वनडे क्रिकेटर ऑफ द ईअर (2017)
क्रिकेटर ऑफ द ईअर (2018)
टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईअर (2018)
वनडे क्रिकेटर ऑफ द ईअर (2018)
स्पिरीट ऑफ द क्रिकेट (2019)
वनडे क्रिकेटर ऑफ द ईअर (2023)
(Virat is the only one in the world to have won 10 ICC awards)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING । पुन्हा एकदा विराटच ठरला वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, मागच्या वर्षीच्या विक्रमांवर टाका एक नजर
संपूर्ण यादी: आजपर्यंत ICCकडून सर्वोत्तम कसोटीपटू म्हणून सन्मानित झालेले क्रिकेटपटू