भारत-इंग्लंड यांच्यातील एजबस्टन येथे पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला ३१ धावांनी निसटता पराभव स्विकारावा लागला.
या सामन्यात भारताकडून सर्वच फलंदाज अपयशी ठरत असताना कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडला एकाकी झुंज देत भारताचे सामन्यातील आव्हान जिवंत राखले होते.
नेहमीच भारतीय क्रिकेटवर टीका करण्याच्या संधीच्या शोधात असणारा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन देखील विराटच्या कामगिरीने प्रभावित झाला आहे.
“विराट कोहलीने त्याच्या गेल्या इंग्लंड दौऱ्यातील चुका टाळत पहिल्या कसोटी सामन्यातील कामगिरीने दाखवून दिले की तो लढवय्या आहे. त्याने ज्या धैर्याने इंग्लिश गोलंदाजांचा सामना केला ते पहाता मला जाणीव झाली की विराट खरेच महान फलंदाज आहे.”
“भारत-इंग्लंड यांच्यात झालेल्या हा रोमांचक सामना कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम सामन्यांपैकी एक आहे. भारतीय फलंदाजांपैकी एका जरी फलंदाजाची विराटला साथ लाभली असती तर हा सामना आज भारताच्या पारड्यात असता.” असे वॉन एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला.
पुढे मायकेल वॉनने कोहलीने कसोटी क्रमवारीती अव्वल स्थान मिळवल्याबद्दलही त्याचे कौतूक केले.
तसेच २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यातील अपयशामुळेच आज विराट एक फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करत आहे असे मायकेल वॉन म्हणाला.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-Video: तर अँडरसन दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळला नसता
-इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो; जो रुट नव्हे, विराटच भारी