बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एजबस्टन मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी (2 आॅगस्ट) पहिल्या डावात 149 धावांची शतकी खेळी केली आहे.
या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांसमोर नांगी टाकली असताना तळच्या फलंदाजांना हाताशी घेत विराटने किल्ला लढवत इंग्लंडला मोठी आघाडी घेण्यापासून रोखले होते.
विराटच्या इंग्लंडमधील पहिल्याच शतकाचे अनेकांनी कौतूक करत हे शतक विराटच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम शतक आहे असे मत व्यक्त केले आहे.
विराट कोहलीला मात्र हे कसोटी शतक त्याच्या कसोटी कारकिर्दीतील प्रथम क्रमांकाचे सर्वोत्तम शतक वाटत नाही. कोहलीने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बीसीसीआयच्या संकेतस्थळाशी बोलताना याचा खुलासा केला.
“मला नाही वाटत की आजचे शतक माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम शतक आहे. मला 2015 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध अॅडलेड येथील सामन्यातील शतक माझ्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम आहे असे वाटते. त्यावेळी आम्हाला धावांचा पाठलाग करायचा होता. त्या डावात मला एकदाही असे वाटले नव्हते की आम्ही या धावांचा पाठलाग करु शकणार नाही.” असे विराट म्हणाला.
2015 सालचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा या सामन्यात विराटने दोन्ही डावात शतक केले होती मात्र भारताचा या सामन्यात थोडक्यात पराभव झाला होता.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
-कोहलीचा असाही एक विक्रम, ज्यासाठी सचिन, द्रविडला खेळावे लागले १० सामने जास्त
-सचिन-कांबळी जोडीची करामत, गांगुलीच्या रुममध्ये झाले पाणीच पाणी…