---Advertisement---

50- 50 आणि 50! विराटने जुळवला ‘हा’ अनोखा योगायोग, वाचून तुम्हीही कराल कौतुक

Virat-Kohli
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याने त्याला ‘रनमशीन’ का म्हणतात हे पुन्हा एकदा दाखवून दिले. विराटसाठी शनिवारचा (दि. 6 मे) दिवस खूपच खास ठरला. आयपीएल 2023च्या 50व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने-सामने होते. या सामन्यात विराटने खतरनाक योगायोग साधला. आयपीएलच्या 50व्या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या बेंगलोर संघाकडून डावाची सुरुवात करणाऱ्या विराटने वादळी अर्धशतक ठोकत 50वे अर्धशतक ठोकले.

झाले असे की, या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी डावाची सुरुवात करण्यासाठी बेंगलोरकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस मैदानात उतरले. यावेळी विराट कोहली याने फाफसोबत पहिल्या विकेटसाठी 82 धावांची खेळी साकारली. विराट संघाच्या 16 षटकांपर्यंत मैदानात टिच्चून फलंदाजी करत होता. यादरम्यान त्याने 42 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यामध्ये 5 चौकारांचा समावेश होता.

विराट कोहलीची 50 अर्धशतके
हे अर्धशतक करताच विराट कोहली याने आयपीएल इतिहासात 50 अर्धशतके करण्याचा विक्रम रचला. अशी कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू ठरला. विराटपूर्वी डेविड वॉर्नर या फलंदाजाने सर्वाधिक 59 अर्धशतके केली आहेत. तसेच, तिसऱ्या स्थानी असलेल्या शिखर धवन याने 49 अर्धशतके केली आहेत.

https://twitter.com/RCBTweets/status/1654867140829392897

आयपीएलमध्ये विराटच्या 7000 धावा पूर्ण
या अर्धशतकांच्या विक्रमासोबतच विराटच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. विराट कोहली याने आयपीएल इतिहासात 7000 धावांचा आकडा पार करण्याचा विक्रम केला. तो अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू बनला. विराटने 233 सामन्यातील 225 डावात 36.68च्या सरासरीने 7043 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 5 शतकांचाही पाऊस पाडला आहे. एवढंच नाही, तर विराटने या धावांचा पाऊस पाडताना तब्बल 129.49च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे.

https://twitter.com/IPL/status/1654850879626022917

विराटनंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी शिखर धवन आहे. धवनने 6536 धावा केल्या आहेत. तसेच, डेविड वॉर्नर तिसऱ्या स्थानी असून त्याने 6189 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त रोहित शर्मा 6063 धावांसह चौथ्या स्थानी आहे. (virat Kohli 50th fifty in his ipl career read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विक्रमी 7 हजार धावा करताना विराटने ‘या’ संघाविरुद्ध चोपल्या सर्वाधिक धावा, बलाढ्य CSK दुसऱ्या स्थानी
आठव्या सामन्यात कॉमेंटेटर, दहाव्या सामन्यात खेळाडू; RCBकडून 38 वर्षीय केदारला कमबॅकची संधी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---