बेंगलोर। आज (4 मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आयपीएल 2019 मधील शेवटचा सामना सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार आहे. बेंगलोरचा संघ आयपीएल 2019 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरला असल्याने हा त्यांचा शेवटचा सामना आहे.
या आयपीएल मोसमात बेंगलोरची कामगिरी खराब झाली आहे. त्यांना आत्तापर्यंत या मोसमात 13 सामन्यांपैकी फक्त 4 सामने जिंकण्यात यश आले.
तसेच 30 एप्रिलला राजस्थान रॉयल्स विरुद्धचा बेंगलोरचा सामना पावसामुळे 5-5 षटकांचा करण्यात आला होता. परंतू सामना सुरु असताना पुन्हा पाऊस सुरु झाल्याने अखेर हा सामना रद्द झाला. त्यामुळे या सामन्यानंतर अधिकृतरित्या बेंगलोरचे आयपीएल 2019 मधील आव्हान संपुष्टात आले.
बेंगलोर संघाचा चाहता वर्ग मोठा आहे. बेंगलोरच्या या खराब कामगिरीने त्यांच्या या चाहत्या वर्गालाही निराश केले आहे. त्यामुळे बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि धडाकेबाज फलंदाज एबी डिविलियर्सने चाहत्यांची माफी मागितली आहे. याचा व्हिडिओ रॉयल चॅलेंजर्स बेंगलेर संघाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
यामध्ये प्रथम डिविलियर्स म्हणाला, ‘आरसीबी चाहत्यांनो, या संपूर्ण मोसमात तूम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. तूम्ही अफलातून आहात. विराटही सहमत असेल की शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाला, पण 5 षटकांचाच करण्यात आलेला हा सामना माझ्या आयुष्यातील एक संस्मरणीय सामना असेल. परंतू त्याचा निकाल लागला नाही. तूम्हाला धन्यवाद.’
यानंतर विराट म्हणाला, ‘या मोसमातील एकच सामना राहिला आहे. आमच्यासाठी आणि तूमच्यासाठीही हा मोसम निराशाजनक होता. पण प्रत्येक वर्षाप्रमाणे पुढिल मोसमात आम्ही येऊन चांगले प्रदर्शन करण्यासाठी सर्वकाही करु.’
विराटने दिलेल्या या भावनिक संदेशानंतर डिविलियर्सही भावूक होत म्हणाला, ‘आमच्या कामगिरीत आलेल्या चढ-उतारांबद्दल माफ करा. आम्हाला आशा आहे की आम्ही चांगल्या कामगिरीने या मोसमाचा शेवट करु. आम्हाला पाठिंबा देत रहा. त्यामुळे आम्हाला उत्साह मिळतो. शेवटच्या सामन्यात काहीतरी विशेष होण्याची आणि पुढच्या मोसमात चांगल्या कामगिरीची आम्ही आशा करतो.’
या व्हिडिओच्या शेवटी विराट म्हणाला, ‘तूमच्या सर्वांसाठी हा खास संदेश होता. कारण मागील सामना तीन तासानंतरही पावसामुळे रद्द झाला, पण तरीही तूम्ही स्टेडियममध्ये बसून होता. आम्ही जेव्हा फलंदाजीला आलो तेव्हा आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले. हे खास होते आणि आमच्या मनात ही खास आठवण कायम राहिल. तूम्ही सर्वोत्तम चाहते आहात, धन्यवाद.’
The last game of the season is here and @imVkohli and @ABdeVilliers17 want you guys to know what’s on their minds. #PlayBold pic.twitter.com/GddTgzy2Zp
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 4, 2019
महत्त्वाच्या बातम्या –
–…आणि अमित मिश्राची आयपीएलमधील चौथी हॅट्रीक हुकली, पहा व्हिडिओ
–१७ व्या वर्षी आयपीएलमध्ये शानदार अर्धशतक करणाऱ्या रियान परागने रचला इतिहास
–टी20 मुंबई लीगमध्ये अर्जून तेंडूलकरला लागली एवढ्या लाखांची बोली





