भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याला त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जाते. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ऍजबस्टन येथे पाचवा कसोटी सामना सुरू होता. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (०३ जुलै) विराट आणि इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेयरस्टो यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर आता विराटचे रौद्र रूप पाहायला मिळाले आहे. विराटने इंग्लंडच्या सलामीवीराची महत्त्वपूर्ण विकेट मिळाल्यानंतर अतिशय आक्रमक सेलिब्रेशन केले आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ दुसऱ्या डावात २४५ धावांवर गुंडाळला गेला आणि इंग्लंडला विजयासाठी ३७८ धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या सलामीवीरांनी संघाला विस्फोटक सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी १०७ धावा जोडल्या. या भागीदारीदरम्यान सलामीवीर ऍलेक्स लीसने (Alex Lees) त्याचे अर्धशतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला एका पाठोपाठ धक्के दिले.
झॅक क्राउले आणि ओली पोप बाद झाल्यानंतर अर्धशतकवीर लीसही धावबाद झाला. रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांनी मिळून लीसला ५६ धावांवर धावबाद केले. डावातील २४व्या षटकात जडेजाच्या गोलंदाजीवर लीस एक धाव घेण्यासाठी पळाला. दुसरीकडे नॉन स्ट्राईकरवर उभा असलेला जो रूटही धाव पूर्ण करण्यासाठी पळाला. इतक्यात शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करत असलेला भारताचा वेगवान गोलंदाज शमीने चेंडू पकडला आणि अचूक नॉन स्ट्राईकरकडे फेकला. तिथे उभा असलेल्या जडेजाने त्वरित चेंडू पकडला आणि यष्ट्या उडवत लीसला धावबाद (Alex Lees Runout) केले.
Virat Kohli just LOVES it 🤣 pic.twitter.com/MbWSrfgU9s
— Sky Sports Cricket (@SkyCricket) July 4, 2022
लीसच्या रूपात भारतीय संघाला मोठी विकेट मिळाल्यानंतर विराटच्या (Virat Kohli) आनंदाला सीमा नव्हत्या. तो मैदानाच्या चहूबाजूंना वेगाने धावत आक्रमक सेलिब्रेशन करताना दिसला. सेलिब्रेशन करताना त्याच्यातील उर्जेला पाहून अनेकजण (Virat Kohli Aggressive Celebration) चकित झाले आहेत. त्याच्या या आक्रमक सेलिब्रेशनने दर्शकांचे लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर त्याच्या सेलिब्रेशनचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
पाचवी कसोटी खेळला नसूनही रोहित ‘नंबर एक’च, शतकवीर पंतही लावू शकला नाही अव्वलस्थानाला धक्का
शतकानंतर अर्धशतक, रिषभ पंतने इंग्लंडविरुद्ध जाळ अन् धूर संगठच काढला; थेट अव्वलस्थानी पोहोचला