विशाखापट्टणम येथे आज (24 ऑक्टोबर) सुरू असलेल्या भारत विरुद्ध विंडीज दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाबाद 157 धावा केल्या आहेत.
यावेळी विराट 118 धावावर असताना त्याने केमार रोचच्या चेंडूवर षटकार मारला. त्यावेळी बाउंड्री लाईनबाहेर उभा असलेल्या बॉल बॉयने विराटने मारलेल्या षटकाराचा अप्रतिम झेल घेतला.
https://www.facebook.com/IndianCricketTeam/posts/2080726855282330
या सामन्यात विराटने त्याचे वनडेतील 37वे शतक साजरे केले. त्याचबरोबर त्याने कर्णधार म्हणून वनडेमध्ये 1000 धावांचा पल्लाही गाठला आहे.
तसेच विराटने आज 213 सामन्यात 205 डावांमध्ये सर्वात जलद अश्या 10009 धावा केल्या आहेत. वनडेमध्ये 10000 धावा पूर्ण करणारा तो 13वा फलंदाज ठरला आहे.
विराट वनडेमध्ये सर्वाधिक वेळा 150 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा भारतीय फलंदाज ठरला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर रोहित शर्मा आहे. रोहितने 6 वेळा असा कारनामा केला आहे. यातील तीन वेळा तर त्याने द्विशतके केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–कर्णधार म्हणून विराटने केली सलग दुसऱ्या वर्षी ही विलक्षण कामगिरी
–“कोहली कोहली” कर्णधार कोहलीवरील हे उस्फुर्त काव्य…!!!
–पाकिस्तानच्या २१८ फलंदाजांना जे जमले नाही ते विराटने करुन दाखवले