आयपीएल २०२२ हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएल फ्रेंचायजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या कर्णधारपदाविषयी सर्वांना उत्सुकता लागून होती. मागच्या हंगामात विराटने कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आणि तेव्हापासून आरसीबीचा पुढचा कर्णधार कोण असा प्रश्न चाहत्यांना पडलेला. आता दक्षिण अफ्रिकेचा दिग्गज फाफ डू प्लेसिस याला आरसीबीचे कर्णधारपद सोपवले गेले आहे. माजी कर्णधार विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांची नवीन कर्णधाराविषयी खास प्रतिक्रिया आली आहे.
आरसीबीचा (RCB) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) म्हणाला की, फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) याच्याकडे हे पद सोपवून चांगले वाटत आहे. विराटने सांगितल्याप्रमाणे तो डू प्लेसिससोबत खेळण्यासाठी उत्सुक आहे आणि अधिक वाट पाहू शकत नाही.
आरसीबीने अधिकृत ट्वीटर खात्यावरून विराटचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत विराट म्हणतो, “मी फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात खेळण्यासाठी खरोखर उत्सुक आहे. त्याच्यासोबत भागीदारी करण्यासाठी वाट पाहू शकत नाही.”
https://twitter.com/RCBTweets/status/1502606075198988292?s=20&t=6y70QGBlh0mNA-FrF0h0HQ
तसेच आरसीबीसाठी अनेक वर्ष खेळलेला दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्स (AB De Villers) यानेही आरसीबीचे कर्णधारपद स्वीकारण्यासाठी डू प्लेसिसला शुभेच्छा दिल्या आहेत. डिविलियर्सच्या म्हणण्याप्रमाणे आरसीबीने जेव्हा मेगा लिलावात डू प्लेसिसला विकत घेतले, तेव्हाच तो संघाचा पुढचा कर्णधार असेल, याची चाहूल लागली होती.
डिविलियर्स म्हणाला की, “मी फाफ डू प्लेसिससाठी आनंदी आहे. जेव्हा त्यांनी (आरसीबी) लिलावात फाफ डू प्लेसिसना निवडले, तेव्हा माझ्या मनात कसलीही शंका नव्हती की, पुढचा कर्णधार कोण असेल.” विशेष म्हणजे डू प्लेसिस आणि एबी डिविलियर्स शाळेपासूनचे चांगले मित्र आहेत.
https://twitter.com/RCBTweets/status/1502622942915702788
दरम्यान, आयपीएल २०२१ नंतर धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने डू प्लेसिसला रिलिज केले आणि मेगा लिलावातही फाफ त्यांच्या हाती लागला नाही. आरसीबीने मेगा लिलावात डू प्लेसिसाला संघात सामील करण्यासाठी ७ कोटी रुपये खर्च केले. आरसीबीच्या कर्णधारपदाविषयी विराट कोहली पुन्हा एक ही जबाबदारी स्वीकारेल, अशी चर्चा होती, पण आता या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘आता ही होणार आरसीबीची नवीन कर्णधार’, म्हणत ‘त्या’ व्हिडिओवरून नेटकऱ्यांनी केले अनुष्काला ट्रोल
क्या बात है! हैदराबाद एफसीचे एक पाऊल फायनलच्या उंबरठ्यावर; एटीके मोहन बागानवर दणदणीत विजय!
क्या बात है! हैदराबाद एफसीचे एक पाऊल फायनलच्या उंबरठ्यावर; एटीके मोहन बागानवर दणदणीत विजय!