आयपीएल स्पर्धेची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. आजपासून (९ एप्रिल) आयपीएलच्या १४ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील सलामीचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघांमध्ये रंगणार आहे. या मोठ्या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करताना दिसून येत आहेत. तसेच विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांनी आक्रमक रूप धारण केल्याचे पाहायला मिळत आहे. या दिग्गज खेळाडूंचा सामन्यापूर्वी सराव करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
यंदा मुंबई इंडियन्स आयपीएलचे ६ वे जेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आपले पाहिले आयपीएल जेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. अशातच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एबी डिविलियर्स आणि विराट कोहली घाम गाळताना दिसून येत आहेत. हे दोघेही चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाच्या चिंतेत नक्कीच वाढ होणार आहे.
मुंबई इंडियन्स संघाला आयपीएल २०१३ पासून खेळलेल्या सलामीच्या सामन्यात विजय मिळवण्यात अपयश आले आहे. अशातच मुंबई इंडियन्स संघासमोर देखील ही साखळी तोडण्याचे मोठे आव्हान असणार आहे. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात ग्लेन मॅक्सवेल एबी डिविलियर्स आणि विराट कोहली यांसारखे आक्रमक फलंदाज आहेत, जे कुठल्याही क्षणी सामना बदलण्याची ताकद ठेवतात.
MI vs RCB Game Day Preview
Virat, AB, Maxi, Yuzi, and the coaches talk about the all-important season opener against Mumbai Indians, on @myntra presents Game Day.#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 pic.twitter.com/yVJj1j8pyh
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 9, 2021
तसेच या संघात देवदत्त पडीक्कलला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे विराट कोहली सलामी फलंदाजी करणार का आणि जर सलामी फलंदाजी केली तर त्याच्यासोबत सलामी फलंदाजीस कोण उतरणार? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
म्हणून कर्णधार रोहित इतरांपेक्षा वेगळा; सूर्यकुमारने सांगितलं हिटमॅनचं ‘टॉप सिक्रेट’
MIvsRCB: देवदत्त पड्डीकलचं स्थान धोक्यात? ‘हे’ दोन शिलेदार आहेत सलामीच्या स्थानाचे प्रबळ दावेदार