भारतीय क्रिकेटपटू खेळाडूंची लव लाइफ आपण सर्वजण जाणून आहोतच. यांच्याबाबत दररोज काही ना काही तरी नवीन ऐकायला किंवा पहायला मिळतेच. दरन्यान, भारताचा महान फलंदाज विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय संघाच्या खेळाडूंसोबत इंग्लंडमध्ये आहे. अशातच विराट पत्नी अनुष्का शर्मासोबत लंडनच्या रस्त्यांवर एन्जॉय करताना दिसून येत आहे. दोघेही लंडनमध्ये कॉफी डेटवर गेल्याचे समोर येते. चला तर जाणून घेऊ या लव्ह बर्डसोबत लंडनमध्ये घडलेला प्रसंग.
लंडनमध्ये कोहलीला बघण्यासाठी गर्दी जमली
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची (India’s great batsman Virat Kohli) जगभरात वेगळीच फॅन फॉलोइंग आहे. असं कधीही होणार नाही की, विराट बाहेर कुठे निघाला आहे आणि त्याच्या चाहत्यांना ते समजले नाही. अशीच एक घटना लंडनच्या रस्त्यावर पाहायला मिळाली आहे. लंडनमध्ये कोहलीला अनुष्कासोबत (Anushka Sharma) कॉफी डेटवर पाहून लोकांची गर्दी झाली. लोक त्या दोघांसोबत सेल्फी घेण्यासाठी बराच वेळ थांबल्याचे दिसून आले.
विराट-अनुष्काने घेतली चाहत्यांसोबत सेल्फी
यादरम्यान विराटने टी-शर्टसह डेनिम जॅकेट परिधान केले तर त्याच्या आवडत्या नर्डी चष्माने त्याचा लूक पूर्ण केला. तुम्ही फोटो पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, दोघे फॅनसोबत आपला वेळ घालवताना आनंदी दिसून येत आहेत. तर डाव्या बाजूला बसलेल्या अनुष्काने स्टायलिश शेड्स असलेला लांब कोट घातला होता. (coffee date in London)
कोहलीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियनशिप गमावली
यापूर्वी, कोहलीने 2019-21 जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (World Test Championship) भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्यावेळी विराटने संघाला अंतिम फेरीत पोहोचवले होते. अंतिम सामन्यात मात्र भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. भारत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कोहलीला संघासाठी काहीतरी करण्याची चांगली संधी असेल.
Virat Kohli and Anushka Sharma Clicked with a Fan Girl in London. pic.twitter.com/DgLzBBAHRj
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) June 1, 2023
आयसीसी स्पर्धेतील दुष्काळ संपुष्टात येऊ शकतो
नुकत्याच संपलेल्या IPL 2023 च्या मोसमात कोहलीने जबरदस्त कामगिरी केली. कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक आणि धावा करणारा खेळाडू ठरला आहे. अशा स्थितीत कोहलीची कामगिरी भारतासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. ज्यामुळे आयसीसी टूर्नामेंटमधील संघाचा दुष्काळ संपुष्टात आणण्यास मदत होऊ शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
”बाहेरच्या देशात जाऊन भारताचे नाव…” आकाश चोप्राची राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका
WTC फायनलआधी ऑस्ट्रेलियाच्या युवा गोलंदाजाचा एल्गार, म्हणाला, “भारताविरुद्ध मी…”