fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

टीम इंडिया दुसऱ्या कसोटीसाठी पुण्यात दाखल

पुणे। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात दुसरा कसोटी सामना पुण्यात होणार आहे. हा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे १० ऑक्टोबरपासून सुरु होईल.

या सामन्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू पुण्यात दाखल झाले असून त्यांनी सरावालाही सुरुवात केली आहे.

सरावाचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच त्याआधी रोहित शर्माने कुलदीप यादवबरोबरचा पुण्याला येण्यावेळीचा विमानतळावरील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता.

View this post on Instagram

On our way to Pune.. @kuldeep_18

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा विशाखापट्टणमला झालेला पहिला कसोटी सामना २०३ धावांनी जिंकला आहे. त्यामुळे सध्या भारतीय संघ ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० ने आघाडीवर आहे.

यामुळे आता भारताला पुण्यात होणारा दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेण्याची संधी आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकाही मालिकेत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

भारताने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे आत्तापर्यंत केवळ १ कसोटी सामना खेळला आहे. हा सामना २०१७ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध झाला होता. पण या सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला होता. मागील ६ वर्षांपासूनचा भारताचा मायदेशातील हा एकमेव कसोटी सामन्यातील पराभव आहे.

View this post on Instagram

All smiles!✌🏻 @rohitsharma45

A post shared by Kuldeep Yadav 🇮🇳 (@kuldeep_18) on

You might also like