fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

‘विराट कोहली आणि मी मैदानाबाहेर बेस्ट फ्रेंड असतो, पण मैदानात मात्र कट्टर शत्रू असतो’

Virat Kohli and I would’ve been best friends off the field and the worst enemies on the field: Shoaib Akhtar

पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचे अनेक भारतीय खेळाडूंशी चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्याने आता असाही दावा केला आहे की तो जर आत्ता खेळत असता तर त्याचे सध्याचा भारताचा कर्णधार विराट कोहलीशीही चांगले संबंध असते.

नुकतेच इएसपीएनक्रिकइन्फो पोडकास्टवर संजय मांजरेकरांशी बोलताना अख्तरने म्हटले आहे की विराट आणि तो दोघेही पंजाबी असल्याने त्यांची गट्टी जमली असती. पण असे असले तरी मैदानात मात्र त्यांच्यात कट्टर प्रतिस्पर्धा दिसली असती. अख्तरही विराटप्रमाणे त्याच्या काळात एक आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जात होता.

अख्तर म्हणाला, ‘विराट कोहली माझ्या चांगल्या मित्रांपैकी एक असता, कारण आम्ही दोघेही पंजाबी आहोत आणि आमचा स्वभावही सारखाच आहे. जरी तो माझ्यापेक्षा ज्यूनियर असला तरी, मी खरोखरच त्याचा आदर करतो. आम्ही चांगले मित्र जरी झालो असतो तरी मैदानात मात्र आम्ही कट्टर शत्रू असतो.’

शोएबने याआधीही अनेकदा विराटचे कौतुक केले आहे. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४१६ सामन्यात ५६.१५ च्या सरासरीने २१९०१ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ७० शतकांचा आणि १०४ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच अख्तरने १९९७ ते २०११ च्या दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २२४ सामने खेळताना २५.१६ च्या सरासरीने ४४४ विकेट्स घेतल्या आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी – 

विराट कोहलीचा ‘हा’ शॉट जगातील सर्वोत्तम

टीम इंडियाचा हा खेळाडू म्हणतो, माझ्याआधी सगळेच एकमेकांना भेटतील, व्हिडिओ पण…

ये दोसती हम नही तोड़ेंगे! १९ वर्षीय जेमिमाहचं हे खास गाणं आहे तिच्या संघसहाकाऱ्यांसाठी

You might also like