इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत आज (२५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. पहिल्या सामन्यात पाँईट टेबल टॉपर्स चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. या सामन्यासाठी चाहते भरपूर उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. सध्या एमएस धोनी आणि विराट कोहली यांचे ग्राफिक्स आणि फोटोज् सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
हे दोन्ही संघ जेव्हाही एकमेकांसोबत भिडले आहेत, तेव्हा चाहत्यांचे पैसावसूल मनोरंजन झाले आहे. या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. तर दुसरीकडे धोनीचे धुरंदर देखील उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.
चाहत्यांनी धोनी आणि विराटच्या फोटोजचे ग्राफिक्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल केले आहेत. यासोबतच ट्विटरवर देखील चाहते आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका चाहत्याने विराट धोनीला मिठी मारत असल्याचा ग्राफिक्स सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून, “मोठ्या सामन्याची वाट पाहत आहोत. धोनी विरुद्ध कोहली म्हणजेच बर्फ विरुद्ध आग.” हा ग्राफिक्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Match Day 💛#CSKvRCB #RCBvsCSK #DhoniVsKohli #CSK #RCB #WhistlePodu #Yellove pic.twitter.com/bYbUTM6y9W
— ᴅʜᴀᴡᴀʟ ʙʜᴀʀᴡᴀᴅ (@dhavalbharvad7) April 25, 2021
#CSKvRCB#DhoniVsKohli
The Big DAY🔥💥
Only Hours left for the Southern Derby🤙✨️ pic.twitter.com/LP8f4dLxGx— Abhishek Daniel/അഭിഷേക് ഡാനിയേൽ (@gbabhishek18) April 25, 2021
Who will win today's epic clash🔥
What's your prediction?#CSK – hit LIKE button 👍#RCB – Comment RCB#DhoniVsKohli#CSKvRCB#RCBvsCSK pic.twitter.com/UI1Qrd6r0E
— Ak@sh $hetty (@Akshetty99) April 25, 2021
https://twitter.com/RahulKu18470965/status/1386225824391565313?s=20
Match Day And My Favourite Clash is Finally Here People Say #DhoniVsKohli But For Me It Is To See My Two Favourites Together.. #CSKvRCB 💛❤️ pic.twitter.com/HA9ZEDHn9F
— SidNaazFc (@TuYaheenH) April 25, 2021
आयपीएल २०२१ स्पर्धेतील पहिले ४ सामने खेळून चारही सामन्यात विजय मिळवणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला या सामन्यात देखील विजय मिळवून आपली विजयी घोडदौड कायम ठेवायची असेल. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघाकडून पराभूत झाल्यानंतर सलग ३ सामने जिंकणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ या सामन्यात देखील विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्यामुळे या सामन्यात चाहत्यांना महायुद्ध पाहायला मिळू शकते.
एकीकडे फाफ डू प्लेसीस आणि सुरेश रैना तर दुसरीकडे एबी डिविलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल असणार आहेत. याबरोबरच हर्षल पटेल, मोहम्मद सिराज या बेंगलोरच्या धाकड गोलंदाजांवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. तर चेन्नईचे दीपक चाहर, रविंद्र जडेजा यांच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एक ही तो दिल है, कितनी बार जीतोगे! ‘माही’ने स्टाफ मेंबरला केला सलाम, फोटो तूफान व्हायरल
जेव्हा कोहली धोनीचे ग्लोव्हज घालून करतो त्याचीच नक्कल, Video पाहून जुन्या आठवणी होतील ताज्या