---Advertisement---

कोहली, शास्त्री अन् आयसीसी ट्रॉफी, एक न सुटणारं गणित; सलग तिसऱ्या टूर्नामेंटमध्ये झालीय निराशा

On: सोमवार, नोव्हेंबर 8, 2021 10:22 AM
Virat-Kohli-Ravi-Shastri
---Advertisement---

भारतीय संघाला आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने १० गडी राखून तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून विजय मिळवला होता. पुढे सलग २ सामने जिंकूनही भारताचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग खडतर होता. अखेर रविवारी (७ नोव्हेंबर) अफगानिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यानंतर भारतीय संघ आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाला आहे. सलग तिसऱ्यांदा प्रशिक्षक रवी शास्त्री आणि विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाला आयसीसी स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आयसीसी विश्वचषक २०१९ विरुद्ध न्यूझीलंड –
इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी विश्वचषक २०१९ स्पर्धेत भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली होती. यावेळी हा संघ उपांत्य फेरीत दाखल झाला होता. परंतु त्यांना या सामन्यात विजय मिळवण्यात अपयश आले होते. न्यूझीलंड संघाने हा सामना १८ धावांनी आपल्या नावावर केला होता.

आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना –
भारतीय संघाने आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचण्यासाठी खूप मेहनत केली होती. बलाढ्य संघांना त्यांचाच मायभूमीत जाणून पराभूत देखील केले होते. अंतिम सामन्यात भारतीय संघासमोर न्यूझीलंड संघाचे आव्हान होते. या सामन्यात न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून विजय मिळवला होता.

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ –
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. संघांतील काही खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेत जोरदार कामगिरी केली होती. परंतु एकाही खेळाडूला साजेशी कामगिरी करता आली नाही. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला ८ गडी पराभूत केले. पुढील सलग ३ सामने जिंकूनही गुणतालिकेत भारताला तिसऱ्या किंवा चौथ्या समाधानी मानावे लागणार आहे. त्यामुळे विराट कोहलीचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

नामिबिया संघाविरुद्ध होणारा सामना हा विराट कोहलीच्या टी-२० कारकिर्दीतील कर्णधार म्हणून शेवटचा सामना असणार आहे. या सामन्यानंतर तो एक फलंदाज म्हणून संघात खेळताना दिसून येईल.

महत्त्वाच्या बातम्या-

अफगाणिस्तानच्या पराभवाने ‘विराट ब्रिगेड’चे तुटले काळीज, नामिबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी घेतला ‘मोठा’ निर्णय

इंग्लंडविरुद्ध ९४ धावा चोपणाऱ्या दक्षिण आफ्रिकी फलंदाजाची कार्तिकला पडली भुरळ, उधळली स्तुतीसुमने

अरेरे, काय वेळ आली! भारत टी२० विश्वचषकातून बाहेर, माजी भारतीय शिलेदारानेच उडवली संघाची खिल्ली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---