---Advertisement---

सामना पराभूत होण्याचे मुख्य कारण कोणी क्रिकेटपटू नाही तर ‘ही’ गोष्ट, विराट आणि अश्विनचा त्रागा

On: बुधवार, फेब्रुवारी 10, 2021 1:31 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाला मंगळवारी (९ फेब्रुवारी) इंग्लंडने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभवाचा जोरदार धक्का दिला. या सामन्यानंतर बऱ्याच प्रतिक्रिया समोर आल्या. इंग्लंडने भारताला चेन्नईला पार पडलेल्या पहिल्या कसोटीत २२७ धावांनी पराभूत केले. या पराभवानंतर विराट कोहली आणि आर अश्विनने प्रतिक्रिया दिली असून त्यांनी सामन्यात वापरण्यात आलेल्या एसजी चेंडूला पराभवासाठी जबाबदार धरले आहे.

भारतीय कर्णधार विराट कोहली याचे म्हणणे आहे की एसजी चेंडूची गुणवत्ता ही खराब असून त्याची शिवण खूप लवकर खराब होते आणि या सर्वाचा त्रास हा गोलंदाजाना होतो.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरले जाणारे चेंडू हे प्रामुख्याने तीन प्रमुख कंपन्या बनवतात यात कुकाबुरा एसजी, आणि ड्युक यांचा समावेश आहे. एसजी चेंडूचा उपयोग हा भारतात कसोटी क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा केला जातो. परंतु भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एसजी चेंडूच्या वापरावर आक्षेप घेतला आहे.

विराट कोहलीच्या मते एसजी चेंडूची गुणवत्ता ही पहिल्या सारखी राहिली नाही. कसोटीत ६० षटके पूर्ण झाल्यानंतर एसजी चेंडू हा पूर्णपणे खराब होत चालला होता, जो होता कामा नये. कोणत्याही संघाला याची अपेक्षा नसते. पुढे देखील तो असेही म्हणाला की आम्ही हरल्यामुळे हे केवळ निमित्त आहे असे सांगत नसून इग्लंड संघाने या सामन्यात चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांचा संघ कसोटी विजयास पात्र आहे.

विराट कोहली याने सन २०१८ मध्ये देखील एसजी चेंडूच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे केले होते.

आर अश्विनचीही एसजी चेंडूवर टीका 

भारतीय संघाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने देखील या कसोटीच्या सुरवातीच्या दिवसात चेंडूच्या शिवणावर खंत व्यक्त केली होती. त्याच्या मते, “मी एसजी चेंडूची शिलाई ही कधीच खराब होताना पहिली नाही. कदाचित खेळपट्टी खराब असल्याने मला असे वाटत होते. परंतु दुसऱ्या डावाच्या ५४ ते ४० षटकानंतर देखील तीच परिस्थिती दिसुन आली”.

विराट कोहली प्रमाणे अश्विनने देखील एसजी चेंडूच्या गुणवत्तेवर नाराजी व्यक्त केली असून त्याच्या मते कुकाबुराचा चेंडू हा अधिक अनुकूल आहे.

या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय गोलंदाज हे एसजी चेंडूच्या गुणवत्तेवर खुश नव्हते आणि त्यांनी चेंडू बदलण्यासठी पंच नितीन मेनन आणि अनिल चौधरी यांच्याकडे मागणी देखील केली होती. परंतु, पंचांनी त्यांची ती मागणी फेटाळून लावली होती.

महा स्पोर्ट्सचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

ज्यावेळी विराट कोहलीने सन २०१८ मध्ये एसजी चेंडू संदर्भात नाराजी व्यक्त केली होती, तेव्हा सर्व सामने हे ‘ड्युक’ चेंडूने खेळले जावे असे त्याने सांगितले होते. त्यावेळी वेस्ट इंडीजचा संघ हा भारत दौऱ्यावर होता. तेव्हा सुद्धा चेंडू संदर्भात विराट कोहली म्हणाला होता की, कसोटी क्रिकेटसाठी ड्युकचा चेंडू हा सर्वोत्तम चेंडू असून मी हा चेंडू जगभरात वापरला जाईल यासाठी शिफारस नक्की करेन. कारण ह्या चेंडूची शिवण घट्ट असून तो अधिक सुसंगता राखतो.

जगातील वेगवेगळे देश हे वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू वापरतात. भारतात खेळण्यासाठी एसजी चेंडूचा वापर अधिक केला जातो तर इंग्लंडमध्ये ड्युक चेंडूचा वापर केला जातो. ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि पाकिस्तान आपल्या देशात कुकाबुरा या चेंडूचा वापर करतात.

महत्त्वाच्या बातम्या – 

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेआधी मुंबईच्या प्रशिक्षकपदी ‘या’ दिग्गजाची निवड

विराट, रुट, विलियम्सन की स्मिथ, पाहा कोण आहे चौथ्या डावाचा ‘किंग’

सचिन मैदानात होता; वानखेडेवर इतिहास घडत होता, तरीही जगात कुणालाच याची साधी खबरसुद्धा नव्हती…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---