भारताचे दोन दिग्गज क्रिकेटर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. (Virat Kohli And Rohit Sharma Retired From Test Cricket) दोघांनीही इन्स्टा पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली. याआधी या दोन्ही खेळाडूंनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.तरीही विराट कोहली आणि रोहित शर्मा अजूनही बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीत आहेत आणि त्यांचा ए प्लस (A+) श्रेणीत समावेश आहे. तर पुढे त्याचं डिमोशन होणार का? चला तर या बातमीद्वारे आपण सविस्तर जाणून घेऊया.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) काही दिवसांपूर्वी केंद्रीय करार यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये त्यांनी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना ए प्लस श्रेणीत ठेवले. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे हे माहीत असतानाही. तर पूर्वी बीसीसीआयचा नियम होता की ते, कोणत्याही एका फारमॅटमधून निवृत्त झालेल्या खेळाडूला ए किंवा बी श्रेणीत ठेवत असत. परंतु त्यांनी विराट आणि रोहितसाठी हा नियम आवश्यक मानला नाही.
विराट कोहली आणि रोहित शर्मा ए प्लस श्रेणीत आहेत, परंतु दोघांनीही कसोटी आणि टी20 मधून निवृत्ती घेतली आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआय त्यांना ए किंवा बी श्रेणीत अवनत करेल की दोघांनाही ए प्लस श्रेणीत राहू देईल हे पाहणे मनोरंजक ठरेल. टी20 मधून निवृत्ती घेतल्यानंतरही, विराट-रोहितचा ए प्लस श्रेणीत समावेश करण्यात आला. अशा परिस्थितीत, विराट आणि रोहित यांचे डिमोशन केले जाण्याची शक्यता खूपच कमी आहे.
जर बीसीसीआयने विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचे डिमोशन केले तर दोघांनाही कोट्यवधींचे नुकसान होईल. बीसीसीआय दरवर्षी ए प्लस श्रेणीतील खेळाडूंना 7 कोटी रुपये देते. जर विराट रोहित अ श्रेणीत सामील झाले तर त्यांना 2 कोटींचे नुकसान होईल कारण अ श्रेणीसाठी दरवर्षी 5 कोटी रुपये निश्चित केले आहेत. दुसरीकडे, जर दोघेही ब श्रेणीत गेले तर त्यांना 4 कोटींचे नुकसान होईल. ब श्रेणीसाठी बीसीसीआयने वार्षिक 3 कोटी रुपयांची मर्यादा निश्चित केली आहे.






