आज, 3 जुलैपासून इंग्लंड विरुद्ध भारत संघात टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत 3 टी20 सामने होणार आहेत.
या मालिकेत दोन भारतीय फलंदाजांना टी20 कारकिर्दीत 2000 धावा करण्याची संधी आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा हे ते दोन खेळाडू आहेत.
विराटने 59 टी20 सामन्यात 48.58 च्या सरासरीने 1992 धावा केल्या आहेत. तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथा आहे.
रोहित शर्माने 81 टी20 सामन्यात 31.43 च्या सरासरीने 1949 धावा केल्या आहेत. तो देखील आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचवा आहे.
त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 2000 धावा पुर्ण करण्यासाठी अनुक्रमे 8 आणि 51 धावांची गरज आहे.
याआधी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टील, ब्रेंडन मॅक्क्युलम आणि पाकिस्तानच्या शोएब मलिकने 2000 धावांचा टप्पा पार केला आहे.
तसेच भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये फक्त मिताली राजने 2000 धावांचा टप्पा पार केला आहे.
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू:-
2271 – मार्टिन गप्टील, सामने- 75
2140 – ब्रेंडन मॅक्क्युलम, सामने- 71
2039 – शोएब मलिक, सामने- 100
1992- विराट कोहली, सामने- 59
1949 – रोहित शर्मा, सामने- 81
हे आहेत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारे भारतीय फलंदाज:-
1992 धावा – विराट कोहली
1949 धावा – रोहित शर्मा
1578 धावा – सुरेश रैना
1455 धावा – एमएस धोनी
1177 धावा – युवराज सिंग
महत्त्वाच्या बातम्या:
–आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये आज झाली विश्वविक्रमी भागिदारी
–पंड्या बंधूंना अंतिम ११मध्ये संधी द्याचं; या माजी खेळाडूची विनंती
–सौरव गांगुलीपाठोपाठ आता गंभीरही करणार या क्रिकेट बोर्डात बाॅसगिरी!