Jasprit Bumrah: भारतीय संघ जून महिन्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यापूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्माने निवृत्तीची घोषणा केली. (Virat Kohli And Rohit Sharma Test Retirement) त्यानंतर आता संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे एक धक्कादायक विधान समोर आले आहे. (Jasprit Bumrah Statement) इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झाली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाईल. (Shubman Gill Captain)
जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असलेल्या जसप्रीत बुमराहने आपल्या निवृत्तीच्या योजनांचा खुलासा केला आहे. बुमराहने ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मायकल क्लार्कच्या यूट्यूब पॉडकास्ट शो ‘बेयॉन्ड 23’ मध्ये सांगितले की, जेव्हा त्याचे शरीर योग्य प्रकारे क्रिकेट खेळू शकणार नाही, तेव्हा तो निवृत्तीची घोषणा करेल. (Cricket Retirement Plan) बुमराह म्हणाला की, “कोणत्याही खेळाडूसाठी दीर्घकाळ सर्व काही खेळत राहणे कठीण आहे. मी बऱ्याच काळापासून असे करत आहे, पण एका टप्प्यावर तुम्हाला हे समजून घ्यावे लागते की तुमचे शरीर कोणत्या दिशेने जात आहे.” (Jasprit Bumrah Fitness)
पुढे बोलताना जसप्रीत बुमराह म्हणाला, “तुम्ही आपल्या शरीराबाबत हे निश्चित केले पाहिजे की कोणती स्पर्धा खेळणे अधिक महत्त्वाचे आहे. खेळाडूने आपल्या शरीराचा वापर करताना थोडे हुशार असावे, एक क्रिकेटर म्हणून मला माझ्या कारकिर्दीत काहीही सोडायचे नाही आणि मी नेहमीच पुढे जायला उत्सुक असतो.” (Jasprit Bumrah Statement)
भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी रोहित शर्माने (7 मे) रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. (Rohit Sharma Test Retirement) यानंतर 5 दिवसांनी विराट कोहलीनेही (12 मे) रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. (Virat Kohli Test Retirement) जरी जसप्रीत बुमराहने अजून निवृत्तीची कोणतीही घोषणा केली नसली तरी, त्याने हे स्पष्ट केले आहे की, ज्या दिवशी त्याला वाटेल की त्याचे शरीर खेळू शकत नाही, त्या दिवशी तो निवृत्ती घेईल. (Jasprit Bumrah Retirement)





