भारतीय संघ द ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी दोन हात करत आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी पाचारण केले. जागतिक कसोटी क्रमवारीत गोलंदाजीत अव्वलस्थानी असलेल्या फिरकीपटू आर अश्विनला या सामन्यातून वगळण्यात आले. जेव्हा भारतीय कर्णधार रोहित नाणेफेकीसाठी गेला, तेव्हा मात्र विराट व रोहितच्या नावावर एक मोठा विक्रम जमा झाला.
भारतीय संघाने आजपर्यंत आयसीसीच्या स्पर्धांच्या 11 फायनल खेळल्या आहेत. ज्यात आयसीसी विश्वचषक, आयसीसी टी20 विश्वचषक, आयसीसी वनडे चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपचा समावेश आहे. 1983 साली वनडे विश्वचषक, 2000 व 2001 साली चॅम्पियन्स ट्रॉफी, 2003 साली विश्वचषक, 2007 साली टी20 विश्वचषक, 2011 साली वनडे विश्वचषक, 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी, 2014 साली टी20 विश्वचषक, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2021 कसोटी चॅम्पियनशीप आणि सध्या सुरु असलेली कसोटी चॅम्पियनशीप अशा फायनलचा समावेश होतो.
भारताने खेळलेल्या आयसीसी स्पर्ध्यांच्या या 11 फायनलपैकी माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग चक्क 7 फायनल खेळला आहे. तर विराट कोहली व रोहित शर्मा प्रत्येकी 6 फायनल खेळले आहेत. जगातील फक्त युवराज सिंग, कुमार संगकारा व माहेला जयवर्धने यांनीच ७ वेळा आयसीसीच्या स्पर्धांची फायनल खेळली आहे. पॉंटिंग, रोहित व विराटच्या नावावर आता प्रत्येकी ६ फायनल जमा झाल्या आहेत. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याने आपल्या कारकिर्दीत पाच फायनल खेळल्या व त्यापैकी तीनमध्ये कर्णधार म्हणून विजेता होण्याचा मान त्याला मिळाला.
(Virat Kohli And Rohit Sharma Played There Sixth ICC Final Surpassed MS Dhoni)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC FINAL| नाण्याचे नशिब रोहितच्या बाजूने, ऑस्ट्रेलियाला फलंदाजीचे आमंत्रण, अशी आहे प्लेईंग इलेव्हन
विराटने ताज्या केल्या रोहित सोबतच्या जुन्या आठवणी, म्हणाला, “त्याला पहिल्यांदा पाहिले आणि…”