रविवारी (दि. 15 जानेवारी) तिरुवनंतपुरम येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा खेळला गेला. विशेष म्हणजे, मालिकेतील पहिले दोन वनडे सामने जिंकत भारत तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेला क्लीप देण्यासाठी उतरला होता. या सामन्यात भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली व शुबमन गिल यांनी शतके झळकावत भारतीय चाहत्यांचे मनोरंजन केले. या दोघांच्या शतकामुळे भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 391 धावांचे आव्हान ठेवले.
Innings Break!
A stupendous knock of 166* from @imVkohli & a fine 116 by @ShubmanGill guides #TeamIndia to a formidable total of 390/5.
Scorecard – https://t.co/muZgJH3f0i #INDvSL @mastercardindia pic.twitter.com/aGHQU7PQVw
— BCCI (@BCCI) January 15, 2023
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित आणि शुबमन (Shubman Gill) गिल या सलामीवीर जोडीने पहिल्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी करत संघाचा चांगली सुरुवात दिली. उभय संघांतील या सामन्यात विराट भारतासाठी शतक करणारा दुसरा फलंदजा ठरला. त्याच्या आदीत शुबमन गिल याने संघासाठी 97 चेंडूत 116 धावा केल्या होत्या. सत कर्णधार रोहित शर्मा याने 49 चेंडूत 42 धावा केल्या. विराटने डावातील 44 व्या षटकात स्वतःचे शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने आणखीनच आक्रमक रूप धारण केले. त्याने आपल्या धावांची गती वाढवत 150 धावांच्या दिशेने वाटचाल सुरू केली. 38 धावा करत श्रेयस अय्यरने त्याला चांगली साथ दिली. विराटने अखेरपर्यंत नाबाद राहताना 110 चेंडूवर 166 धावा कुटल्या. यात 13 चौकार व 8 षटकारांचा समावेश होता. श्रीलंकेसाठी रजिथा व कुमारा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
(Virat Kohli and Shubman Gill Century Helps indja to post 390 in last odi against srilanka)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
षटकार किंग हिटमॅनच! श्रीलंकेविरुद्ध पहिला सिक्सर मारताच धोनीला ‘या’ यादीत टाकले मागे
पंजाबचा वाघ ऑस्ट्रेलियात चमकला! विक्रम रचूनही कुणालाच लागला नाही पत्त्या, जाणून घ्याच