ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ प्रत्येकी एक-एक सामना जिंकत बरोबरीत आहेत. यातील तिसरा आणि निर्णायक सामना उद्या (18 जनेवारी) मेलबर्न येथे खेळला जाणार आहे.
मेलबर्नचा सामना जिंकत भारताला ऑस्ट्रेलियामध्ये इतिहास घडवण्याची संधी आहे. त्यांनी याआधी कधीही ऑस्ट्रेलियामध्ये द्विपक्षीय वनडे मालिका जिंकलेली नाही.
याआधी भारताने ऑस्ट्रेलियामध्ये 1985ची वर्ल्ड चॅम्पियनशीप आणि 2008ची सीबी मालिका जिंकली आहे. सीबी मालिकेत तीन संघ खेळायचे.
भारतीय संघाची ही ऑस्ट्रेलियामधील दुसरीच द्विपक्षीय वनडे मालिका आहे. 2016ला झालेल्या मालिकेत भारताला 4-1ने पराभूत व्हावे लागले होते.
ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत मेलबर्नमध्ये भारताविरुद्ध 14 वन-डे सामन्यापैकी 9 सामने जिंकले आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाला फेब्रुवारी 2017नंतर वन-डे मालिका जिंकता आलेली नाही.
2018-19च्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वन-डे मालिकेआधी भारताने कसोटी मालिकेत 2-1 असा ऐतिहासिक विजय मिळवला असून टी20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
या वनडे मालिकेत पहिल्या सामन्यातील पराभव मागे सारत दुसऱ्या सामन्यात भारताने चांगली कामगिरी केली. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या निर्णयक वनडे सामन्यात विजय मिळवत मालिकेचे विजेतेपद कोण मिळवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–४० वर्षीय वसीम जाफरचा युवा खेळाडूंना लाजवेल असा द्विशतकी धमाका
–संघाचा समतोल राखण्यासाठी हार्दिक पंड्या संघात हवा, भारताच्या खेळाडूने मांडले मत
–भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी या खेळाडूचे झाले ९ महिन्यांनी न्यूझीलंड संघात पुनरागमन