---Advertisement---

कॅप्टन्सी सोडली, पण आक्रमकता नाही! बावुमाच्या उत्तराला कोहलीचं प्रत्युत्तर अन् भर सामन्यात पेटला वाद

---Advertisement---

पर्ल| दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्या बुधवारी (१९ जानेवारी) ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना (First ODI) झाला. बोलँड पार्क स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमानांनी ४ बाद २९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला २६५ धावाच करता आल्या आणि भारताने ३१ धावांनी हा सामना गमावला. यासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

या सामन्यादरम्यान भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) यांच्यात वाद झाल्याचे (Kohli And Bavuma Exchange Words) पाहायला मिळाले. 

व्हिडिओ पाहा- २०११ विश्वचषक भारताचे हिरो, ज्यांचे योगदान आज कोणाला आठवत नाही

दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरू असताना हा प्रसंग घडला. डावातील ३६ वे षटक टाकत असलेल्या फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या चौथ्या चेंडूवर बावुमाने शॉर्ट कव्हरला साधा शॉट मारला. या भागात क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराटने पटकन तो चेंडू पकडला आणि जोराने स्टंपच्या दिशेने थ्रो केला. यावेळी बावुमा स्ट्राईकवरच उभा होता. आपण धाव घेण्यासाठी पळालो नसतानाही विराटने एवढ्या जोराने चेंडू फेकल्याचे पाहून तो चिडला आणि विराटला रागाने काहीतरी म्हणू लागला.

https://twitter.com/Sunainagosh7/status/1483761528407203842?s=20

हे पाहून भारताचा माजी कर्णधारही रागाला आला आणि त्याने बावुमासा प्रत्युत्तर द्यायला सुरू केले. विराटला रागाने आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून दक्षिण आफ्रिकी कर्णधाराने शांत बसण्यात शहाणपण समजले आणि तो त्वरित गप्प झाला. यामुळे वाद तिथेच संपला. मात्र विराट आणि बावुमामध्ये झालेल्या या काही मिनिटांच्या शाब्दिक बाचाबाचीने सामना दर्शकांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्यातील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

दरम्यान विराटसोबत वाग्युद्ध करणाऱ्या कर्णधार टेम्बा बावुमाने रासी वॅन डर डूसेनसोबत मिळून शानदार द्विशतकी भागिदारी रचत संघाची धावसंख्या ३०० च्या जवळ नेली. बावुमा वैयक्तिक १४३ चेंडूंचा सामना करताना ८ चौकारांच्या मदतीने ११० धावा केल्या. तर डूसेन १२९ धावांवर नाबाद राहिला. ९६ चेंडूंचा सामना करताना ४ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने त्याने ही खेळी केली. परिणामी दक्षिण आफ्रिकेने ३१ धावांनी हा सामना खिशात घातला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विजयरथावर स्वार ‘यंग टीम इंडिया’ला मोठा धक्का, कर्णधार- उपकर्णधारासह ६ खेळाडू कोरोनाच्या विळख्यात

भारतीय गोलंदाजांची दाणादाण उडवत बावुमा-डूसेनची जोडी ‘सुपरहिट’! द्विशतकी भागिदारीसह रचला इतिहास

वनडे मालिका| पहिल्याच पेपरात कर्णधार राहुल नापास, दक्षिण आफ्रिकेकडून टीम इंडियाचा ३१ धावांनी पराभव

हेही पाहा-

२०११ विश्वचषक भारताचे हिरो, ज्यांचे योगदान आज कोणाला आठवत नाही | India's Unsung heroes of 2011WC

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---